Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेतील घुसखोरीचे संसदेत जोरदार पडसाद; राजनाथ सिंह यांचे सर्व पक्षांना निवेदन; म्हणाले, कुणालाही पास देताना…..

  • By युवराज भगत
Updated On: Dec 14, 2023 | 01:00 PM
लोकसभेतील घुसखोरीचे संसदेत जोरदार पडसाद; राजनाथ सिंह यांचे सर्व पक्षांना निवेदन; म्हणाले, कुणालाही पास देताना…..
Follow Us
Close
Follow Us:
Parliament Attack : बुधवारी लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन न आल्यामुळे या घटनेच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. हा गोंधळ इतका वाढला की कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत तब्बल ३ तासांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. यादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत या प्रकाराबाबत आपली भूमिका मांडली.
नेमकं काय घडलं बुधवारी लोकसभेत?
लोकसभेत बुधावारी दुपारी कामकाज चालू असताना दोन तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदार बसतात त्या ठिकाणी आले. तिथून हे तरुण वेगाने अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेनं धावत निघाले. यावेळी त्यांनी हातातील स्मोक कँडल फोडून सभागृहात धूर केला. मात्र, काही खासदारांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणांची वेळीच धरपकड केली. काही खासदारांनी त्यातल्या एका तरुणाला तर चांगलाच चोप दिला. दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक तरुण व एक महिला घोषणाबाजी देत होते. त्यांनीही स्मोक कँडलचा वापर केल्यामुळे संसद परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
सुरक्षारक्षकांनी चौघांना घेतले ताब्यात
हा प्रकार घडताच सुरक्षारक्षकांनी या चौघांना ताब्यात घेतलं. बुधवारी दिवसभर केलेल्या तपासात या सगळ्या प्रकाराच्या नियोजनात सहभागी असलेल्या आणखी दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांबरोबरच आयबीही या प्रकाराचा तपास करत आहे.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
दरम्यान, या प्रकारावर पंतप्रधान मोदींकडून कोणतंही निवेदन न आल्यामुळे विरोधकांनी गुरुवारी सकाळी कामकाज सुरू होताच लोकसभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना शांततेचं आवाहन केलं. “काल जो प्रकार घडला, सगळ्यांनीच त्या घटनेचा निषेध केला. ही फार दुर्दैवी घटना आहे यात कोणतंही दुमत नाही. अध्यक्षांनीही त्याची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मला वाटतं की भविष्यात सत्ताधारी वा विरोधी पक्षाच्या सर्वच खासदारांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या कुणाला प्रवेशासाठी पास देत आहोत, त्यात अशा कुठल्या व्यक्तीला पास दिला जाऊ नये जो अशा प्रकारचा कुठला प्रकार संसदेत करेल. आपण सगळ्यांनीच ही काळजी घेणं गरजेचं आहे”, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं.
भविष्यातील उपाययोजनांचेही निर्देश
दरम्यान, असाच प्रकार जुन्या संसद भवनातही घडल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केलं. “आपल्या जुन्या संसद भवनातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मला वाटतं या घटनेचा सर्वांनी मिळून निषेध करायला हवा. अध्यक्षांनी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे व भविष्यातील उपाययोजनांचेही निर्देश दिले आहेत. मला वाटतं संसदेत अशा प्रकारे गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची गरज नाही”, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
…आणि सभागृहाचं कामकाज तहकूब
राजनाथ सिंह यांच्या आवाहनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी व गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं.

Web Title: Rajnath singhs statement on lok sabha intrusion case they said giving a pass to anyon we all need to take care of this read detail repotrt nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2023 | 12:58 PM

Topics:  

  • home minister amit shah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.