Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muslim Reservation Controversy: मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून बाहेर काढा! भाजप खासदाराच्या मागणीने नव्या वादाची ठिणगी

देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजांना आरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, तामिळनाडू आणि झारखंड यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 31, 2026 | 02:28 PM
Muslim Reservation Controversy: मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून बाहेर काढा! भाजप खासदाराच्या मागणीने नव्या वादाची ठिणगी
Follow Us
Follow Us:

Muslim Reservation Controversy:  देशातील सरकारी परीक्षांमध्ये मुस्लीम तरुण-तरुणी आपल्या मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवतात. या यशावरूच आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काही समाजकंटकांकडून या यशाची तुलना ‘जिहाद’सारख्या शब्दांशी करून दिशाभूल केली जात आहे. हा वाद आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. भाजप खासदार के. लक्ष्मण यांनी राज्यसभेत मुस्लीम आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संसदेतील वादाचे नेमके कारण काय?

के. लक्ष्मण संसदेत बोलताना म्हणाले की, ‘काही राज्यांमध्ये ‘ओबीसी’ (OBC) आरक्षणाचा धर्माच्या नावावर गैरवापर केला जात आहे. विशिष्ट राज्यांमध्ये मुस्लिमांना या कोट्याचा लाभ दिला जात असून, सरकारने अशा धर्म-आधारित आरक्षणांची समीक्षा करावी आणि मुस्लिमांना या प्रवर्गातून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी केली. पण के लक्ष्मण यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत संसदेतून सभात्याग (Walkout) केला.

बिहारमधील शीतळा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी

केरळ आणि कर्नाटकमधील मुस्लिम आरक्षण

कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून सुमारे ४ टक्के आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केला. याव्यतिरिक्त, त्यांनी पश्चिम बंगालचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने मागासलेल्या वर्गांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो.

तसेच, तामिळनाडूतील मुस्लिम समाजासाठी असलेल्या स्वतंत्र आरक्षण प्रणाली राबवली जात आहे. तर केरळमध्ये मुस्लिम समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात आली.

काय सांगते भारतीय संविधान?

आरक्षणाबाबत संविधानात स्पष्ट तरतुदी आहेत. त्यानुसार,

अनुच्छेद १५(१) आणि १६(२): संविधानातील या कलमांनुसार, राज्य सरकार कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करू शकत नाही.  केवळ ‘मुसलमान’ या धर्माच्या आधारावर आरक्षण देणे असंवैधानिक मानले जाते.

पोटगी प्रकरणात मोठा निर्णय! पतीचे उत्पन्न वाढवून सांगितल्यास कारवाई नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

मागासलेपणाचा निकष: जरी केवळ धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नसले, तरी मुस्लीम समुदायातील ज्या जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो. अनेक राज्यांमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लीम समाजातील विशिष्ट मागास जातींचा समावेश ओबीसी यादीत करण्यात आला आहे.

 

कोणत्या राज्यांमध्ये मुस्लिमांना ओबीसी आरक्षण मिळत आहे?

देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजांना आरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, तामिळनाडू आणि झारखंड यांचा समावेश आहे. तसेच, सर्व राज्यांमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जात नाही, तर केवळ मुस्लिमांमधील विशिष्ट मागासलेल्या जातींनाच दिले जाते. बंगालमधील हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे, कारण २०११ नंतर राज्य सरकारने अनेक मुस्लिम समाजांचा ओबीसी यादीत समावेश केला, ज्यामुळे एकूण मागास जातींमध्ये मुस्लिमांचा वाटा ११८ पेक्षा जास्त झाला. अलीकडेच, कलकत्ता उच्च न्यायालयाने २०१० नंतर समाविष्ट केलेल्या ७७ नवीन जातींचा (बहुसंख्य मुस्लिम) ओबीसी दर्जा रद्द केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे, ज्यामुळे ही प्रमाणपत्रे वैध ठरली आहेत. परिणामी, राज्य सरकार मुस्लिम समाजाच्या मोठ्या भागाला आरक्षणाचे लाभ देत आहे.

 

Web Title: Remove muslims from obc category bjp mp k laxmans statement sparks rajya sabha walkout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.