गंगटोक : सिक्कीममध्ये (Sikkim) घटणारी लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग (prem singh tamang) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जास्त मुले जास्त मुले जन्माला घातल्यास सरकार त्यांना विषेश सवलती देणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, जास्त मुले जन्माला घालतात त्यांना विविध प्रोत्साहने दिली जातील. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष वेतनवाढीसह (increment ) दोन वेतनवाढ प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं. अशी योजना राबविणारे सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य आहे.
[read_also content=”राज्यात होणार परकीय गूंतवणूक; डाव्होसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती https://gumlet.assettype.com/esakal/2022-03/fcc1c733-336e-4f5a-b446-bd6fc93d81c3/investment_think.jpg?dpr=1.0&q=100&w=800&h=500″]
मुख्यमंत्री रविवारी दक्षिण सिक्कीममधील जोरथांग शहरात माघ संक्रांतीच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. ते म्हणाले की, सिक्कीमच्या प्रजनन दराने (Fertility rate) अलीकडच्या काही वर्षांत प्रती स्त्री एक बालक असा सर्वात कमी वाढ नोंदवल्यामुळे वांशिक समुदायांची लोकसंख्या कमी झाली आहे. तमांग म्हणाले, “आम्हाला महिलांसह स्थानिक लोकांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित करून घटत्या प्रजनन दराला रोखण्याची गरज आहे.” मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने सेवेत असलेल्या महिलांना आधीच 365 दिवसांची प्रसूती रजा आणि पुरुष कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची पितृत्व रजा दिली आहे, ज्यामुळे त्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना दुसऱ्या अपत्यासाठी एक आणि तिसऱ्या अपत्यासाठी दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारचा आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, एकापेक्षा जास्त अपत्ये झाल्यास सामान्य लोकही आर्थिक मदतीसाठी पात्र असतील, ज्याचा तपशील आरोग्य आणि महिला आणि बाल संगोपन विभागांद्वारे तयार केला जाईल.
तमांग म्हणाले की ज्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यात समस्या आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सरकारने सिक्कीमच्या रुग्णालयांमध्ये IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेतून मुलांना जन्म देणाऱ्या सर्व मातांना तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत 38 महिलांनी आयव्हीएफ सुविधेच्या मदतीने गर्भधारणा केली असून त्यापैकी काही माताही झाल्या आहेत. तमांग यांनी सिक्कीमच्या लोकांवर एकच मूल असून लहान कुटुंब असावे यासाठी दबाव आणल्याबद्दल पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला फटकारले. सध्या सिक्कीमची अंदाजे लोकसंख्या सात लाखांपेक्षा कमी आहे, त्यापैकी सुमारे 80 टक्के वांशिक समुदाय आहेत.