harassment of overcharging tourists in Goa
गोवा : देशातील सर्वांत लहान राज्य म्हणजे गोवा हे त्याच्या पर्यटनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. परदेशातील अनेक पर्यटक गोव्यामध्ये पर्यटनासाठी येत असतात. गोव्याची वेगळी अशी समृद्ध परंपरा असून ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. गोव्याचे अर्थकारण देखील पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र सध्या गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटक चालली आहे. ही एक चिंताजनक बाब असून याचा फटका अनेक व्यवसायिकांना बसण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये पर्यटकांना छळले जात असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत भाजप आमदाराने तक्रार दाखल केली आहे.
गोव्यामध्ये येणारे पर्यटक हे समुद्र किनारे पाहण्यासाठी आणि गोव्यामध्ये अंतर्गत पर्यटनालाठी खाजगी गाड्या घेत असतात. पर्यटकांना भाडेतत्त्वावर या गाड्या दिल्या जातात. मात्र गाड्या वापरणाऱ्या या पर्यटकांना पोलिसांकडूनच त्रास दिला जात आहे. पोलिसांकडूनच या पर्यटकांचा छळ केला जात असल्याची तक्रार गोवा भाजपच्या आमदारांनी राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली आहे. महासंचालकांचती भेट घेत याबाबत पाऊले उचलण्याची विनंती केली आहे.
पर्यटक नेहमी भाड्याने गाड्या घेतात. पण त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने वाहतूक पोलीस पर्यटकांचा छळ करत आहेत, या आशयाची तक्रार आमदारांनी केली आहे. याच कारणाने राज्यातील पर्यटकांची संख्या खालावली असल्याचा दावाही या आमदारांनी केला आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो, केदार नाइक आणि डेलिलाह लोबो या तिघांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. तसेच वाहतूक पोलिसांकडून होणारा पर्यटकांचा छळ थांबवण्यासाठी विनंतीही करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठा दंड आकारला जात आहे. त्याचाच हा परिणाम आहे, असा दावा भाजप आमदारांनी केला आहे.
हे देखील वाचा : या समुद्रात कोणीही बुडू शकत नाही, येथील पाणी आहे लोकांसाठी वरदान, दूर करते अनेक रोग
2023 मध्ये दंडापोटी वाहतूक पोलिसांनी लाखो रुपये वसूल केले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या पैसे कमावण्याच्या रॅकेटमध्ये फसलेल्या पर्यटकांकडून ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. फिरायला आणि मज्जा मस्ती करायला आलेल्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका पर्यटकांची नऊ वेळा तपासणी झाल्याचे प्रकरण देखील उघडकीस आले आहे. पर्यटनचा आणि पोलिसांच्या दंडाचा खर्च हा पर्यटकांची संख्या कमी करत आहे. गोव्यामध्ये देशामध्ये आणि परदेशामध्ये वेगळे मत पसरवण्याचे देखील काम करत आहे. याचा परिमाण जनमाणसांवर आणि अर्थकारणावर देखील होत आहेच. यावर उपाय म्हणून एका पर्यटकाला क्यूआर कोड देऊन एकदा कागदपत्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा करण्याची गरज भासणार नसल्याची प्रणाली तयार करण्याची गरज असल्याचे मत तक्रारदार आमदारांनी व्यक्त केले आहे.