'या' शहरांमध्ये सर्वात जास्त विवाहबाह्य संबंध, लग्नानंतरही असतात बरीच अफेअर्स, यादी वाचून धक्काच बसेल (फोटो सौजन्य-X)
Extra Marital Affairs News In Marathi : पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी आणि विश्वास हे तितकेच महत्त्वाचे असतात. नात्यात प्रामाणिकपणा असेव, तर नाते जास्त काळ टिकते. हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढ असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ असो; लग्नानंतर अनेकदा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिसून येतात. अशातच आता भारतात विवाहबाह्य संबंधांवरील अहवालात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, दिल्ली किंवा मुंबई नाही तर एक शहर टॉप-२० यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याबद्दल तुम्ही कदाचित विचारही केला नसेल.
विवाहित असताना एक पुरूष किंवा स्त्री दुसऱ्या पुरुषाशी किंवा स्त्रीशी संबंध ठेवतात आणि याला विवाहबाह्य संबंध म्हणतात. विवाहबाह्य संबंध लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दोन्ही प्रकारांत दिसून येतात. विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंध फक्त शारीरिक संबंधाशी निगडित नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा भावनिकदृष्ट्या समोरच्या व्यक्तीबरोबर कनेक्ट असेल, तर ते नातेसुद्धा विवाहबाह्य संबंधात असू शकते.
आज लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असणे सामान्य झाले आहे. भारतात त्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या वर्षी समोर आलेल्या अहवालाने सर्वांना धक्का दिला आहे. यादीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या शहराचे नाव कोणीही स्वप्नातही विचार केला नसेल. दिल्ली किंवा मुंबई नाही तर दुसऱ्याच एका शहराने विवाहबाह्य संबंधांच्या यादीत बाजी मारली आहे.
हे शहर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये आहे. गेल्या वर्षी मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर होते. पण यावेळी मुंबईचे नाव टॉप-२० यादीतही नाही. दिल्लीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली-एनसीआरमधील ९ भागांची नावे या यादीत आहेत. डेटिंग वेबसाइट अॅशले मॅडिसनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२४ मध्ये कांचीपुरम १७ व्या स्थानावर होते. परंतु २०२५ मध्ये ते अचानक पहिल्या क्रमांकावर पोहोचले. या वैवाहिक संबंध प्लॅटफॉर्मवर साइन अप करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे.
विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाहीत: सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आयपीसीच्या कलम ४९७ ला असंवैधानिक घोषित केले आणि म्हटले की प्रौढांमधील संमतीने होणारे संबंध गुन्हा मानले जाऊ शकत नाहीत. तथापि, हे संबंध घटस्फोटाचा आधार बनू शकतात. न्यायालयात ते मानसिक क्रूरता म्हणून गणले जाऊ शकते.
अॅशले मॅडिसनचे मुख्य धोरण अधिकारी पॉल कीबल म्हणतात की भारतातील विवाहबाह्य संबंध आता लपवून ठेवण्यासारखे राहिलेले नाहीत. येथील लोक नात्यांबद्दल अधिक मोकळेपणाने विचार करू लागले आहेत. हा केवळ लैंगिक संबंधांचा विषय नाही तर भावनिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु विवाहबाह्य संबंधांचा परिणाम केवळ जोडप्यावरच नाही तर मुलांवरही होतो. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.