फोटो सौजन्य: Freepik
एकेकाळी या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत जाण्याचा सोयीस्कर मार्गे म्हणजे ट्रेन, एवढीच काय ती ट्रेनची ओळख होती. पण आजच्या विकसित जगात, ट्रेन्स सुद्धा विकसित झाल्या आहेत. जेव्हा आपण ऍडव्हान्स आणि वेगवान ट्रेनबद्दल बोलतो तेव्हा आपसूकच आपल्या डोळ्यांसमोर येते ती जपानची बुलेट ट्रेन. ताशी ३२० किलोमीटरच्या वेगाने धावणारी ही ट्रेन नक्कीच एका आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे.
जगभरात आपल्या अत्याधुनिक रेल्वेचा डंका वाजवल्यानंतर, आज आम्ही तुम्हाला जपानमधील अशाच एका ट्रेनबद्दल सांगणार आहोत जी चक्क चाकांशिवाय चालते आणि हजरो किलोमीटरचा प्रवास काही तासातच पूर्ण करते. चला पाहुयात, नेमके या ट्रेनचे नावे काय?
मॅग्लेव्ह ट्रेन, ज्याला मॅग्नेटिकली लेव्हिटेड ट्रेन म्हणूनही ओळखले जाते. ही एक हाय-टेक ट्रेन सिस्टीम आहे जी ट्रेनला ट्रॅकच्या वर उचलण्यासाठी आणि ट्रेन चालवण्यासाठी चुंबकीय शक्ती वापरते. ही ट्रेन पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. या ट्रेनमध्ये एक हायटेक सिस्टिम वापरली गेली आहे, ज्यामुळे ही ट्रेन बुलेटच्या वेगाने धावते.
मॅग्लेव्ह ट्रेन तुम्हाला ताशी ५०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने पोहोचू शकतात, ज्यामुळे ही ट्रेन जगातील सर्वात वेगवान ट्रेनच्या यादीत आपले स्थान बनवते. चुंबकीय शक्तीमुळे, मॅग्लेव्ह गाड्या फार कमी घर्षण करत धावतात, ज्यामुळे तुमचा प्रवास हा अगदी शांततेत तसेच आरामदायी होतो. सध्या ही ट्रेन जपान, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये कार्यरत आहे.
भारत सरकारने मॅग्लेव्ह ट्रेन तंत्रज्ञानाबद्दल रस दाखवले आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकारने २०१८ मध्ये मुंबई-पुणे मार्गावर मॅग्लेव्ह ट्रेनसाठी जपानसोबत सामंजस्य करार सुद्धा केला होता. परंतु अजूनही प्रकल्प त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याला अनेक आव्हाने आहेत, जसे की अवाढव्य खर्च आणि भूसंपादन.