Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tirupati donation theft : तिरुपती मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधींची चोरी; देवस्थानातील व्यक्तीने केला हात साफ, व्हिडिओ व्हायरल

Tirupati donation theft : सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2025 | 12:43 PM
Tirupati Balaji Temple donation box dollar theft Lokesh Nara shares viral video

Tirupati Balaji Temple donation box dollar theft Lokesh Nara shares viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दानपेटीमध्ये चोरी झाल्याचा आरोप
  • लोकेश नारा यांनी शेअर केला व्हिडिओ
  • 2023 मधील तिरुपती डॉलर प्रकरण चोरी पुन्हा चर्चेत

Tirupati donation theft : तिरुमला : तिरुपती बालाजी मंदिराचे भाविक संपूर्ण देशामध्ये आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविक येतात. सर्वात श्रीमंत अशा मंदिरामध्ये सढळ हाताने भाविक देवाच्या श्रद्धेने दान करत असतात. मात्र आता तिरुपती बालाजी मंदिराच्या दानपेटीबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. मंदिरातील दानपेटीमधील पैसे चोरी झाली असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून मंदिराच्या ट्रस्टने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

तिरुपती मंदिरामध्ये मिळणाऱ्या लाडू प्रसादाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. वर्षभरापूर्वी या मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळ असल्याचे उघडकीस आले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना लोकांच्या श्रद्धेला देखील धक्का बसला होता. हे लाडूमधील भेसळ प्रकरणानंतर आता दानपेटीमधील चोरी हा मुद्दा गाजला आहे. आंध्रप्रदेशमधील भाजपा आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीबरोबर सत्तेत असलेल्या तेलुगू देसम पार्टीन हा आरोप केला आहे. राज्यात वायएसआर काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचे टीडीपीने म्हटले. या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी विशेष तपास पथकाची स्थापना केली. याचबरोबर चोरीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तिरुपती बालाजी मंदिरातील दानपेटीतील चोरीचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजते आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र हे घोटाळ्याचे प्रकरण एप्रिल 2023 मधील आहे. त्यावेळी आंध्रप्रदेश राज्यात जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार होते. या प्रकरणात तिरुमला देवस्थानाचे माजी कर्मचारी रविकुमार यांच्यावर दानपेटीतून १०० डॉलरच्या नऊ नोटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी २० सप्टेंबर रोजी या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज शेअर केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेमध्ये आले. लोकेश यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तिरुमला मंदिर समितीचे माजी अध्यक्ष भुमाना करुणाकर रेड्डी यांच्यावरही १०० कोटी रुपयांची चोरीचा आरोप केला आहे.

लोक अदालतीचा निर्णय स्थगित

सतीश कुमार यांनी रविकुमार यांना मंदिरातील दानपेटीतून चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रविकुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ३० मे २०२३ रोजी तिरुपती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एका लोक अदालतमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यावेळी सतीश कुमार आणि रवी कुमार यांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तडजोड केल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी एम. श्रीनिवासुलू नावाच्या एका व्यक्तीने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून दानपेटीतील पैशांच्या कथित घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत लोक अदालतीचा निर्णय स्थगित केला.

#YCPTirumalaMahaPapam
వైసిపి గజదొంగలు శ్రీవారి సొత్తూ దోచుకున్నారు. వందకోట్ల పరకా’మనీ దొంగ’ వెనుక వైసీపీ నేతలు
జగన్ ఐదేళ్ల పాలనలో అవినీతి రాజ్యమేలింది. అరాచకం పెచ్చరిల్లింది. దొంగలు, దోపిడీదారులు, మాఫియా డాన్లకు ఏపీని కేరాఫ్ అడ్రస్ చేసారు జగన్. గనులు, భూములు, అడవులు, సమస్త… pic.twitter.com/Pwssua12YM — Lokesh Nara (@naralokesh) September 20, 2025

देशांसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तिरुपती बालाजी ट्रस्टचे म्हणणे काय?

मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टकडून आपली भूमिका स्पष्ट केली. चोरीचे हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असूच शकत नाही. कारण हा कोट्यवधी भाविकांचा त्यावर विश्वास असल्‌याचे देवस्थानचे विद्यमान सदस्य व भाजपा नेते जी. भानुप्रकाश रेड्डी यांनी म्हटले. त्यावेळच्या मंदिर प्रशासनातील सदस्यांची ही गंभीर चूक आहे. रविकुमार यांच्याविरोधातील गुन्हे समेट करण्यायोग्य नसतानाही लोक अदालतीमध्ये हे प्रकरण मिटवण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला होता. या चोरीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वायएसआर काँग्रेसमधील नेतृत्वालाच मोठा फायदा झाला, असे भानुप्रकाश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७९ आणि ३८१ अंतर्गत चोरीसंबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे फक्त न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच मागे घेतले जातात, असेही ते म्हणाले आहेत.

Web Title: Tirupati balaji temple donation box dollar theft lokesh nara shares viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • Andhra Pradesh

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे
1

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण
2

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या
3

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video
4

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.