बिहाराच्या राजकारणात येणार रंगत; नितीश कुमार १०२ जागा लढवणार !
पाटणा : बिहारच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोणता पक्ष, किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यात नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू 102 जागा लढवणार असल्याची माहिती दिली जात आहे.
भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांच्यात जागावाटपाची सहमती झाली असून, लवकरच त्या संदर्भातील औपचारिक घोषणा केली जाणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते. उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपपेक्षा एक जागा जास्त सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एनडीएमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. जनता दल युनायटेड १०२ आणि भाजपा १०१ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची
चिराग पासवान यांनी जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतल्याचे दिसून येते. लोक जनशक्ती पार्टीला ४० जागा सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी सोमवारी केली. आम्ही आमच्या पक्षाला मिळालेल्या जागांवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले. भाजपातील सूत्रांनुसार, चिराग पासवान यांना ४० जागा हव्या आहेत. मात्र, त्यांना २० हून अधिक जागा देऊ नये, अशी भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांची भूमिका आहे.
बिहारचे राजकारण नितीशकुमार यांच्याभोवती
गेल्या अनेक दशकांपासून बिहारचे राजकारण हे नितीश कुमार यांच्या पक्षाभोवती फिरते आहे. त्यांच्याबरोबर युती केल्याशिवाय राज्यात सत्तास्थापन केली जाऊ शकत नाही, असे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे.
जागावाटपाची घोषणा 3 ऑक्टोबरनंतर
बिहारच्या निवडणूक समीकरणात जेडीयू आणि भाजप एकमेकांसाठी अविभाज्य आहेत. दरम्यान, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बिहारमधील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत कोणाचा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची आहे.