Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turkey Steel Plant Explosion: तुर्की हादरलं! स्टील कारखान्यात भीषण स्फोट, मृतांचा आकडा १६ वर

Turkey Steel Plant Explosion: तुर्कीच्या इजमिर प्रांतातील आलियागा भागात असलेल्या आयरन आणि स्टील प्लांटमध्ये सोमवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 16 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 03:48 PM
Turkey Steel Plant Explosion: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Turkey Steel Plant Explosion: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुर्कीतील स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट.
  • दुर्घटनेत 16 कामगारांचा मृत्यू, 13 जखमी.
  • घटनेच्या चौकशीचे आदेश; 5 जण ताब्यात.

तुर्कीमधून एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. तुर्कीच्या इजमिर प्रांतातील आलियागा भागात असलेल्या एका नामांकित आयरन आणि स्टील प्लांटमध्ये सोमवारी एक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल १६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण तुर्की देशात शोककळा पसरली आहे. Turkey Steel Plant Explosion:

सोमवारचा दिवस तुर्कीसाठी खूप वाईट ठरला. सकाळी सगळे कामगार रोजच्यासारखे कामावर आले होते. कोणाला माहिती होतं, आजचाच दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरणार आहे. इजमिरमधल्या आलियागा भागात एक मोठा आयरन आणि स्टीलचा कारखाना आहे. तिथे अचानक एवढा मोठा स्फोट झाला की सगळा परिसर हादरून गेला. लोकांना वाटलं भूकंप आलाय की काय.या स्फोटात 16 कामगार जागीच गेले. 13 जण जखमी झालेत. त्यातले 2 जणांची अवस्था खूपच गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, अशी भीती सगळ्यांना वाटतेय. राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोआन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या भीषण दुर्घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी स्वतः ही बातमी दिली.

नेमकं झालं तरी काय?

प्रांतीय गव्हर्नर सुलेमान एल्बान यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये एका बॉयलर बदलण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक एक क्रेन भट्टीमध्ये कोसळली, ज्यामुळे तिथे भीषण स्फोट झाला आणि आग लागली.प्लांटमध्ये त्या दिवशी बॉयलर बदलायचं काम चालू होतं. मोठं काम होतं. त्यासाठी क्रेनने काम चालू होतं. अचानक ती क्रेन थेट भट्टीत कोसळली. आणि मग काय, क्षणात स्फोट झाला. आगीचे मोठे लोट उठले. काळा धूर सगळीकडे पसरला.

30-Year-Old Chinese Man Retires: वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी घेतली रिटायरमेंट! ना नोकरी, ना बॉसचा त्रास; कसं केलं आर्थिक नियोजन?

त्यादिवशी प्लांटमध्ये नेहमीपेक्षा कमी लोक होते. रोज 300 कामगार असतात, पण त्या दिवशी बॉयलरचं काम असल्याने फक्त 200 कामगार होते. जर 300 असते तर आकडा अजून मोठा असता. तरी पण 16 घरं उध्वस्त झाली.स्फोट इतका जबरदस्त होता की, परिसरातील जमीन हादरली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमाका इतका भयानक होता की अनेकांना सुरुवातीला तीव्र भूकंपाचा झटका आल्याचे भासले. लोक घरातून बाहेर पळाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. टीव्हीवर दाखवत होते, प्लांटमधून आगीचे लोट आणि काळ्या धुराचं साम्राज्य पसरलं होतं. ते दृश्य बघूनच अंगावर काटा येत होता.

सरकारने काय केलं?

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्राध्यक्ष एर्दोआन यांनी तात्काळ उच्चस्तरीय न्यायिक आणि प्रशासनिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे आणि कुणाच्या हलगर्जीपणामुळे हा घातपात घडला, याचा कसून शोध घेतला जात आहे.

एर्दोआन यांनी सांगितलं, या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. ज्याच्या चुकीमुळे हे झालंय, त्याला शिक्षा होणारच. न्यायमंत्री अकिन गुरलेक यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल चार सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी चालू आहे.

हे 5 जण कोण आहेत, त्यांची काय चूक होती, हे अजून बाहेर आलेलं नाही. पण तपास जोरात चालू आहे.जखमी कामगारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य राबवले जात आहे. अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स, पोलीस सगळे लगेच घटनास्थळी पोहोचले. आग विझवायला खूप वेळ लागला. धूर इतका होता की आत जाणं पण अवघड झालं होतं.

Who Is Gadi Eisenkot? नेतन्याहूंच्या सत्तेला आव्हान देणारे गादी आयझेनकॉट कोण? जाणून घ्या त्यांचा संपूर्ण प्रवास

16 कुटुंबांवर दुःखाचा डोंगरविचार करा, सकाळी घरातून हसत निघालेला माणूस संध्याकाळी परतच येणार नाही, हे कुटुंबासाठी किती मोठं दुःख आहे. 16 कामगार गेले म्हणजे 16 घरातली चूल विझली. कोणी बाप होता, कोणी भाऊ होता, कोणी मुलगा होता.

त्यांच्या घरच्यांचं काय होणार?

तुर्कीमध्ये आता सगळीकडे याच घटनेची चर्चा आहे. लोक विचारतायत, एवढ्या मोठ्या प्लांटमध्ये सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? क्रेन कशी पडली? बॉयलर बदलताना सुरक्षा नियम पाळले होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून बाहेर येतीलच.पण एक गोष्ट नक्की, अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सरकारला कडक पावलं उचलावी लागतील. कामगारांच्या जीवाशी खेळ करून चालणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुर्कीमध्ये स्टील प्लांटचा स्फोट कुठे झाला?

    Ans: तुर्कीच्या इजमिर प्रांतातील आलियागा भागात असलेल्या आयरन आणि स्टील प्लांटमध्ये हा स्फोट झाला.

  • Que: स्टील प्लांटमधील स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या दुर्घटनेत 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: या स्फोटात किती जण जखमी झाले?

    Ans: या दुर्घटनेत 13 कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Turkey izmir steel plant explosion 16 workers killed 13 injured rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.