Udaipur University Vice Chancellor Sunita Mishra controversial statement that Aurangzeb good administrator
Udaipur News : उदयपुर : देशाच्या विविध भागामध्ये मुघल साम्राट औरंगजेबाचे उत्तादीकरण केले जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. काही उपद्रवी लोकांनंतर आता विद्यापीठाचे कुलगुरु देखील औरंगजेबाचे कौतुक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सामाजिक स्वास्थाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उदयपुरमधील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या कुलगुरुंनी औरंगजेब हा सर्वोत्तम शासक असल्याचे म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले. समाजमाध्यमातून आणि विविध स्तरावरुन जोरदार टीका झाल्यानंतर कुलगुरुंनी माफी मागितली आहे.
उदयपूरमधील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या कुलगुरु सुनीता मिश्रा यांनी अखेर माफी मागितली आहे. चौफेर टीका झाल्यानंतर सुनीता मिश्रा यांनी माफी मागितली आहे. सुनीता मिश्रा यांनी औरंगजेबाचे कौतुक करत औरंगजेब हा सर्वोत्तम शासक असल्याचे म्हटले होते. माफीनाम्यामध्ये सुनीता मिश्रा म्हणाल्या की, “उदयपूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत कलेल्या भाषणात मी ओरंगजेबाचे वर्णन एक सक्षम शासक म्हणून केले. यामुळे महाराणा प्रताप यांच्या अनुयायांच्या आणि राजपूत समुदायाच्या भावना दुखावल्या. ही माझी चूक आहे,” अशा भावना सुनीता मिश्रा यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “कधीही या भूमीचा किवा त्याच्या वीरांचा अपमान करण्याचा नव्हता. मी माझ्या चुकीबद्दल मेवाड, राजस्थानमधील सर्व लोकांची आणि विशेषतः राजपूत समुदायाची मनापासून माफी मागते,” अशा शब्दांत मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या कुलगुरु सुनीता मिश्रा यांनी माफी मागितली आहे. या प्रकरामुळे राजस्थानमध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता. मेवाड आणि रजपूत सारखी घराणी असताना औरंगजेबाचे कौतुक केल्याने टीका केली जात होती.
अहवालाच्या आधारे कारवाई करू”
या प्रकरणावर राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री प्रेमचंद बेरवा यांनीही दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे. प्रेमचंद बेरवा म्हणाले की, “हे प्रकरण माझ्या कानावर आले आहे. आम्ही वस्तुस्थितीची चौकशी करू विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे कारवाई करू” अशी स्पष्ट भूमिका उच्च शिक्षण मंत्री प्रेमचंद बेरवा यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विद्यापीठाच्या कुलगुरु सुनीता मिश्रा यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल आता माफी मागितली आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे रोष निर्माण झाला होता. विद्यापीठामध्ये वातावरण तापले होते. त्यांच्या वक्तव्याच्या विद्यार्थ्यांनी देखील तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. कुलगुरुंच्या कॅबिनला देखील कुलूप लावण्यात आले. तर काही आक्रमक विद्यार्थ्यांनी कुलगुरु सुनीता मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. वातावरण तापल्यानंतर सुनीता मिश्रा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.