1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता निवृत्तीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 58 व्या वर्षी जी निवृत्ती घ्यावी लागत होती. त्यात आता दोन वर्षांची वाढ करण्यात आली असून, 60 वर्षी रिटायरमेंट घेता येणार आहे. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये लागू होणाऱ्या केंद्रीय सेवा नियमांची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे याचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
निवृत्तीच्या वयात दोन वर्षांची वाढ करण्यात आली असून, 60 वर्षी रिटायरमेंट घेता येणार आहे. केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या कामकाजात काम करणाऱ्या अखिल भारतीय सेवांचे सदस्य, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कर्मचारी, केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडमध्ये पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या व्यक्तींना, आकस्मिक परिस्थितीतून पैसे भरलेल्या व्यक्तींना हे नियम लागू होणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.
केंद्रीय कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्रीय कर्मचार्यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे 4 हजार रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल, सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे.
या कर्मचाऱ्यांना होणार नाही लागू
अखिल भारतीय सेवांचे सदस्य, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कर्मचारी, यूटी चंदीगडमध्ये पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या व्यक्तींना, आकस्मिक परिस्थितीतून पैसे भरलेल्या व्यक्तींना लागू होणार नाहीत.