देशातील सर्वात लांब पुलाचे केंद्रीयमंत्री गडकरींच्या हस्ते उद्घाटन; अनेक गावांतील अंतर होणार कमी
बंगळुरु : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब सिगंदूर केबल-स्टेड पुलाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी (दि.14) उद्घाटन झाले. या पुलाच्या बांधकामासाठी 472 कोटी रुपयांचा खर्च आला असून, या पुलाच्या बांधकामामुळे सागरा आणि सिगंदूरच्या आसपासच्या गावांमधील अंतर आता कमी होणार आहे.
सिगंदूर हे चौदुरेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच केंद्र सरकारकडून सागरा तालुक्यातील अंबरगोडलू-कलासवल्ली दरम्यान सिंगदूर पूल बांधण्यात आला आहे. ज्याच्या बांधकामासाठी 472 कोटी रुपये खर्च आला आहे आणि त्याच्या बांधकामामुळे सागरा आणि सिगंदूरच्या आसपासच्या गावांमधील अंतर कमी होणार आहे. या पुलाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
Inaugurated India’s second-longest cable-stayed bridge—the 6-km-long Sharavathi Bridge in Karnataka—built at a cost of ₹472 crore to enhance regional connectivity and boost mobility across the Malnad region.#PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/ES4VQoGeRx
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 14, 2025
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह इतर नेते या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणताही सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. या नेत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रणच मिळाले नसल्याचा दावा केला जात आहे.
कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून रंगलं राजकारण
या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून कर्नाटकात राजकारण रंगलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दावा केला की, या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे होते. हा कार्यक्रम आमच्या राज्यात होत होता, म्हणून आम्हाला आमंत्रित करण्यात आले पाहिजे होते. आम्ही संघराज्य व्यवस्थेचा भाग आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
गडकरींकडूनही चोख प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर, नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दावा केला की, मुख्यमंत्र्यांना 11 जुलै रोजीच कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती आणि त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. गडकरी यांनी 12 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राची प्रतही सोशल मीडियावर शेअर केली.