Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

George Soros : जॉर्ज सोरोस अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित; PM नरेंद्र मोदींवर केली होती टीका

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये १९ जणांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 05, 2025 | 05:42 PM
जॉर्ज सोरोस अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित; PM नरेंद्र मोदींवर केली होती टीका

जॉर्ज सोरोस अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित; PM नरेंद्र मोदींवर केली होती टीका

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये १९ जणांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या नावाचा देखील समावेश आहे. मागील काही वर्षांपासून भारतीय राजकारणात सोरोस यांचं नाव चर्चेत राहिलं आहे.

72 तासांत 94 हवाई हल्ले, 184 जणांचा मृत्यू; इस्त्रायलचा गाझामध्ये कहर

उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यावरून सत्ताधारी भाजपने विरोधी पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधला आहे. सोरोस यांना आता अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार सोरोस यांना देण्यात आल्याने त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोरोस यांच्यावतीने त्यांचा मुलगा अ‍ॅलेक्सने हा पुरस्कार स्वीकारला. सोरोस यांच्यासोबतच अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन, फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी, फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अभिनेता डेन्झेल वॉशिंग्टन यांच्यासह इतर काही व्यक्तींचा देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

जॉर्ज सोरोस यांनी 2023 मध्ये म्युनिचमधील संरक्षण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सीएए आणि कलम 370 हटवण्यावरूनही त्यांनी टीका केली होती. त्यानंतर भाजपकडून सातत्याने सोरोस यांच्यावर निशाणा साधला जात आहे. जॉर्ज सोरोस यांना पुरस्कार देण्याचे कारण सांगताना व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, जॉर्ज सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय मजबूत करणाऱ्या जगभरातील संस्थांना पाठिंबा दिला आहे.

बर्फाच्या वादळाचा अमेरिकेत कहर; 6 कोटी लोक होणार बाधित, अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर

कोण आहेत जॉर्ज सोरोस?

जॉर्ज सोरोस अमेरिकन उद्योजक असून त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1930 रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेल्वे पोर्टर आणि वेटर म्हणूनही काम केले. त्यानंतर ते शेअर मार्केटकडे वळले. यातूनच त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली.

औषधोपचार, न्याय व्यवस्था सुधारणाऱ्यांना आणि अपंगांना मदत

1979 मध्ये त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली असून ही संस्था विविध देशांमध्ये कार्यरत आहे. 1999 मध्ये पहिल्यांदा या संस्थेने भारतात प्रवेश केला. ओपन सोसायटी फाउंडेशन या संस्थेद्वारे औषधोपचार, न्याय व्यवस्था सुधारणाऱ्या आणि अपंग लोकांना मदत करणाऱ्या इतर संस्थांना निधी पुरवला जात होता. मात्र, नंतर निधी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसंच अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक फंड देणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. तसेच, त्यांना डावे विचारसरणीचे उद्योगपती म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अनेक देशातील उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातो.

Web Title: Us president joe biden honors businessman george soros presidential medal of freedom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Joe Biden
  • PM Narendra Modi
  • US President

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
4

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.