Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold In Wedding : लग्नात महिला घालणार फक्त तीन दागिने, सामाजिक समानतेसाठी दोन गावांच्या पंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील एका पंचायतीनं एक अजब फर्मान सोडलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2025 | 07:09 PM
लग्नात महिला घालणार फक्त तीन दागिने, सामाजिक समानतेसाठी दोन गावांच्या पंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

लग्नात महिला घालणार फक्त तीन दागिने, सामाजिक समानतेसाठी दोन गावांच्या पंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नात महिला घालणार फक्त तीन दागिने
  • उल्लंघन करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दंड
  • घरगुती कलहांना आळा घालण्यासाठी पंचायतीने हा निर्णय

सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील एका पंचायतीनं एक अजब फर्मान सोडलं आहे. उत्तराखंडच्या जौनसर अनुसूचित जमाती प्रदेशातील दोन गावांच्या पंचायतीने महिलांनी लग्न समारंभात फक्त तीन दागिने घालण्याच्या निर्णयाचे उत्साहाने पालन केले आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी, कंधार आणि इंदारौली गावांच्या संयुक्त पंचायतीने घोषणा केली की, महिला लग्न समारंभात फक्त नाक, कानातले आणि एक मंगळसूत्र घालतील, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल.

२,९०० किलो स्फोटके जप्त, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक, सर्वात मोठ्या जैश मॉड्यूलचा पर्दाफाश

कंधार गावाचे सरपंच प्रताप सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, अधिक दागिने घालून दाखवण्याच्या स्पर्धेमुळे वाढणारी सामाजिक असमानता रोखण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती कलहांना आळा घालण्यासाठी पंचायतीने हा निर्णय घेतला आहे. दोन्ही गावांमधील एकूण ४२ कुटुंबांच्या महिलांनी सामाजिक समानतेच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे उत्साहाने आणि आनंदाने त्वरित पालन केले आहे. या निर्णयानंतर, आमच्या गावातील मुलांचे दोन लग्न झाले,

नेत्यांनीही केले निर्णयाचे समर्थन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चक्राताचे आमदार प्रीतम सिंह यांनीही या निर्णयाला चांगले पाऊल म्हटले आहे. ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती वेगळी असते. पंचायतीच्या या निर्णयामुळे समाजात समानता तर येईलच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील दबावही कमी होईल.

भाजप नेते जोत सिंह बिष्ट म्हणाले की, अशा निर्णयांमुळे समाजातील वाढती स्पर्धात्मकता आणि दिखाऊपणा कमी होतो आणि हे कौतुकास्पद आहे. विकासनगरचे भाजप आमदार मुन्ना सिंह चौहान म्हणाले की, आमच्या पंचायती आधीच सामाजिक सुधारणांसाठी काम करत आहेत आणि या पंचायतीचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अनुसूचित जमाती क्षेत्राचा दर्जा असलेल्या जौनसरमध्ये पंचायतींची विशेष भूमिका आहे.

दारूवरही बंदी घालणार

महिला पंचायतीच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतात, परंतु त्या महणतात की केवळ दागिन्यांवर मर्यादा घालून सामाजिक समानता साध्य होणार नाही आणि लग्न समारंभात महागडी दारू देण्याची प्रथा देखील बंदी घातली पाहिजे. परिसरातील रहिवासी अमला चौहान म्हणाल्या, जर समानता साध्य करायची असेल तर फक्त महिलांच्या दागिन्यांवर बंदी का घालावी? पुरुषांच्या दारू पिण्यावरही बंदी घालावी. सोने ही एक गुंतवणूक आहे, जी कठीण काळात उपयुक्त आहे. दारू आणि इतर फालतू खर्चाचा काय उपयोग? प्रताप सिंह यांनी सांगितले की महिलांची मागणीदेखील वैध आहे आणि ते लवकरच लग्न समारंभात दारूवर बंदी घालतील.

Jawaharlal Nehru Stadium: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडलं जाणार? क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

Web Title: Uttarakhand village panchayat limits gold jewelry weddings to 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Gold
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

RBI’s Silver Loan Policy: आरबीआयची नवी लोन पॉलिसी! आता चांदीच्या दागिन्यांवरही मिळणार कर्ज? 
1

RBI’s Silver Loan Policy: आरबीआयची नवी लोन पॉलिसी! आता चांदीच्या दागिन्यांवरही मिळणार कर्ज? 

तुमच्या फोनमध्ये दडलंय सोनं! अनेकांना ठाऊक नाही याची जागा, पण तुम्ही माहिती करून घ्या
2

तुमच्या फोनमध्ये दडलंय सोनं! अनेकांना ठाऊक नाही याची जागा, पण तुम्ही माहिती करून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.