Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

विनेश फोगटने १३ डिसेंबर २०१८ रोजी कुस्तीगीर सोमवीर राठीशी लग्नगाठ बांधली होती. हा विवाह हरियाणातील चरखी दादरी येथे पारंपारिक विधींनी पार पडला. चरखी दादरी विनेशचे मूळ गाव देखील आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 01, 2025 | 03:59 PM
Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Follow Us
Close
Follow Us:

Vinesh Phogat become Mother: भारताची स्टार कुस्तीगीर आणि जुलाना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार विनेश फोगटकडून आज (१ जुलै) आनंदाची बातमी समोर आली आहे. विनेशने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी येताच कुटुंब, राजकीय वर्तुळासह आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली. विनेश आणि तिचा मुलगा दोघेही निरोगी आहेत आणि या निमित्ताने कुटुंबासह हरियाणा काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आनंदाची बाब म्हणजे देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कुमारी शैलजा यांनी केले अभिनंदन

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी विनेश यांना त्यांच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाबद्दल अभिनंदन केले आहे. कुमारी शैलजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विनेश फोगाटला शुभेच्छा दिल्या आहेत. “जुलाना येथील काँग्रेस आमदार श्रीमती विनेश फोगट जी यांना मुलाच्या जन्माबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मी देवाला प्रार्थना करते की नवजात बाळ कुटुंबात आनंद आणि मंगल घेऊन येवो आणि तुम्ही दोघेही निरोगी आणि आनंदी राहा.”अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय पक्षातीलनेत्यांकडून आणि समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार…; मोदींना अमेरिकेतून फोन, एस. जयशंकरांचा गौप्यस्फोट

जुलाना से कांग्रेस विधायक श्रीमती @Phogat_Vinesh जी को पुत्र रत्न की प्राप्ति पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।

ईश्वर से प्रार्थना है कि नवजात शिशु परिवार के लिए आनंद और शुभता लेकर आए तथा आप दोनों स्वस्थ एवं प्रसन्नचित्त रहें।

— Kumari Selja (@Kumari_Selja) July 1, 2025

विनेश २०१८ मध्ये कुस्तीगीर सोमवीर राठीशी विवाह

विनेश फोगटने १३ डिसेंबर २०१८ रोजी कुस्तीगीर सोमवीर राठीशी लग्नगाठ बांधली होती. हा विवाह हरियाणातील चरखी दादरी येथे पारंपारिक विधींनी पार पडला. चरखी दादरी विनेशचे मूळ गाव देखील आहे. लग्नानंतरही विनेशने तिची कुस्ती कारकीर्द सुरू ठेवली आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.

‘Maalik’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार राव दिसला डॅशिंग अंदाज

२०२४ च्या ऑलिंपिकनंतर निवृत्ती

पण गेल्या वर्षी केवळ १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला २०२४ च्या ऑलिंपिक पात्रता फेरीत अंतिम टप्प्यातून बाहेर पडावे लागले. या अनुभवानंतर तिने कुस्तीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात नशीब आजमावले. काँग्रेसमध्ये दाखल होत तिने २०२४ मध्ये जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झली. पण आता ती एका नवीन भूमिकेत, आई म्हणून, विनेश फोगटने तिच्या आयुष्यातील आणखी एक प्रेरणादायी अध्याय सुरू केला आहे.

Web Title: Vinesh phogat becomes mother little guest arrives at vinesh phogats house fans shower wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Vinesh phogat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.