Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार; ३४ जणांना अटक, इंटरनेटही बंद

कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना ३ एप्रिलपर्यंत हिंसाचारावर कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 29, 2025 | 11:18 AM
West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार; ३४ जणांना अटक, इंटरनेटही बंद
Follow Us
Close
Follow Us:

मालदा: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसर आणि आसपासच्या भागात दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षाची घटना समोर आली आहे. यानंतर या प्रकरणात ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. परिसरात मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना ३ एप्रिलपर्यंत हिंसाचारावर कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता, राज्याने सावधगिरी बाळगून अशा हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.

या विषयावर, राज्यमंत्री आणि स्थानिक टीएमसी आमदार सबिना यास्मिन म्हणाल्या, “आम्ही नुकतीच समुदाय आणि गटांमध्ये शांतता बैठक पूर्ण केली आहे. बैठक खूप सकारात्मक होती.  परिस्थिती लवकरच सामान्य होईल.  इंटरनेट बंद असूनही, येणाऱ्या ईद आणि रामनवमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ (प्रतिबंधात्मक आदेश) लागू करण्यात आलेले नाहीत. मंत्री म्हणाले, “रामनवमी आणि ईदच्या सणामुळे कलम १४४ लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पोलिस आणि प्रशासनाने मोठ्या गर्दीला जमू दिले जाणार नाही असा संदेश पसरवला आहे.”

ईदला भारताचे या ‘७’ मशिदीला एकदातरी द्यावी भेट, येथे वास्तुकला आणि बंधुत्वाची दिसते झलक

परिसरात कडक पोलिस बंदोबस्त

पोलिस महानिरीक्षक राजेश यादव यांनी सांगितले की, कालियाचक ब्लॉकमधील संवेदनशील भागांमध्ये राज्य सशस्त्र पोलिस आणि आरएएफच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.  पोलिस दल संपूर्ण परिसरावर सतत नियंत्रण ठेवत असून, गस्त पथके बाजारपेठांसह विविध भागांत फिरत आहेत.

मालदा पोलिसांनी ‘X’ वर पोस्ट करत सांगितले की, गुंडांविरोधात छापे आणि अटक कारवाई सुरू असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही अनुचित घटनेस त्वरित प्रतिसाद देण्यासाठी मोबाईल युनिट्स सक्रिय करण्यात आल्या असून पोलिस बंदोबस्त आणखी मजबूत करण्यासाठी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे.

Kunal Kamra Intrim Bail: मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर

३४ जणांना अटक, परिस्थिती नियंत्रणात

जिल्हा पोलिसांनी माहिती दिली की, परिसरात २४ तास गस्त सुरू आहे आणि संभाव्य गोंधळाच्या कोणत्याही संकेतावर त्वरीत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी एका प्रार्थनास्थळाजवळून धार्मिक मिरवणूक गेल्यानंतर गुरुवारी हिंसाचार उसळला. या हिंसाचारात जाळपोळ, तोडफोड आणि नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Violence in malda district of west bengal 34 people arrested internet also shut down nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • West bengal

संबंधित बातम्या

BJP on West Bengal:  ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?
1

BJP on West Bengal: ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?

मोठी बातमी! काहीतरी घडणार: नेपाळमधील हिंसाचाराचे लोण भारतात? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट
2

मोठी बातमी! काहीतरी घडणार: नेपाळमधील हिंसाचाराचे लोण भारतात? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट

पश्चिम बंगालमध्ये SIR-NRC ची दहशत; मूळ रहिवासी कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ
3

पश्चिम बंगालमध्ये SIR-NRC ची दहशत; मूळ रहिवासी कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल
4

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.