पनवेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी; ऐनवेळी रेल्वे गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलल्याने एकच धावपळ
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी (30 ऑक्टोबर) सकाळी गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 9 जण जखमी झाले होते. याचपार्श्वभूमीवर आता वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेनेही लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान दररोज सुमारे २.५ कोटी लोक रेल्वेने दररोज प्रवास करत असतात. वाहतुकीसाठी भारतीयांची पहिली पसंती रेल्वे आहे. देशातील सर्व प्रमुख शहरे रेल्वे नेटवर्कशी जोडलेली असल्यामुळे आणि कमी भाडे यामुळे लोक प्रवासासाठी ट्रेनला प्राधान्य देतात. रेल्वे प्रवासी रेल्वेच्या डब्यातही सामान घेऊन जाऊ शकतात. पण, सामानाचे वजन आणि आकारही ठरलेला असतो. विहित वजन आणि आकारापेक्षा जास्त सामान घेऊन डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड होऊ शकतो. अनेकवेळा लोकांना चालत्या ट्रेनमध्ये गैरसोयीचा सामना करावा लागतो. याचपार्श्वभूमीवर रेल्वेकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिवाळीचं मोठ गिफ्ट
रेल्वेच्या नियमांनुसार वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वे प्रवासी 40 किलो ते 70 किलो वजनाचे सामान त्यांच्यासोबत रेल्वेच्या डब्यात ठेवू शकतात. रेल्वेने डब्यानुसार वजन निश्चित केले आहे. स्लीपर क्लासमध्ये प्रवासी 40 किलो वजन उचलू शकतात. एसी टू टायरमध्ये ५० किलोपर्यंत सामान नेण्यासाठी भत्ता आहे. फर्स्ट क्लास एसीमध्ये, प्रवासी कोचमध्ये ७० किलोपर्यंतचे सामान सोबत घेऊन जाऊ शकतात. प्रवाशांचे सामान निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास रेल्वे त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते. वजनाबरोबरच सामानाचा आकारही ठरलेला असतो. 100 सें.मी. X 60 सेमी. X 25 सेमी. ट्रंक, सूटकेस आणि बॉक्सेस (लांबी X रुंदी X उंची) आकाराचे वैयक्तिक सामान म्हणून प्रवासी डब्यात नेण्याची परवानगी आहे.
27 ऑक्टोबरला पहाटे 5.56 वाजता वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी घटना घडली. 22921 वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. दिवाळी आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी केली होती. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 22 सामान्य वर्गाचे डबे असलेली रिकामी अंत्योदय एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणली जात होती.
हे सुद्धा वाचा: सायबर चोरट्यांनी हॉस्पिटलच्या बँक खात्यातून चोरले 29 लाख रुपये , ई-मेलही केला हॅक
ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली. ट्रेन नुकतीच यार्डातून फलाटावर आणली होती आणि बोगीचे दरवाजे आतून बंद होते. काही लोक ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मवर पडले. सुरुवातीला असे दिसते की, लोक बोगीला आदळल्याने या दोन बोगींमधील लोक प्लॅटफॉर्मवर पडले. ‘सामान्यत: ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर बोगींचे दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर प्रवासी ट्रेनमध्ये चढतात.’