नवी दिल्ली: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) केवळ सत्ता गमवावी लागली नाही, तर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनीही आपापल्या जागा गमावल्या. अण्णा आंदोलनातून राजकारणात उतरलेल्या केजरीवाल यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत मोठे यश मिळवले होते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करत राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख निर्माण केली. मात्र, या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात ते अपयशी ठरले.
गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेवर असलेल्या AAP ला यंदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाची जागा केवळ २२ वर आली, तर भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत २७ वर्षांनंतर सत्ता काबीज केली. या पराभवामुळे केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजना धोक्यात आल्या आहेत.
WhatsApp देणार Gpay-Phonepay टक्कर! लवकरच लाँच होणार ‘ही’ सर्व्हिस, आजच जाणू
दिल्लीच्या सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. गेल्या २७ वर्षांपासून विरोधात असलेली भाजप आता प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे, तर ११ वर्षे सत्तेत असलेला AAP पक्ष पहिल्यांदाच विरोधी बाकावर बसेल. सत्ता असताना विरोधी नेत्यांना सभागृहाबाहेर काढणारे केजरीवाल आता विरोधात राहून कसे लढतील, हा मोठा प्रश्न आहे. सौरभ भारद्वाज आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते कोण असतील, हे अद्याप स्पष्ट नाही. गोपाल राय आणि आतिशी यांनी निवडणूक जिंकली असून, ते या भूमिकेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
आता AAP ला केवळ दिल्लीतील नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत राबवलेले विकास मॉडेल देशभर प्रसिद्ध केले, पण दिल्लीकरांनीच त्यांना नाकारल्याने त्याच्या प्रभावावर प्रश्न निर्माण होईल. हा पराभव पंजाबच्या राजकारणावरही परिणाम करू शकतो. केजरीवाल यांच्यासाठी हा पराभव केवळ राजकीय नव्हे, तर वैयक्तिक धक्का आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता असून, इंडिया आघाडीतून काही पक्ष त्यांच्यापासून अंतर राखतील.
Today Horoscope: या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी योगामुळे आजचा दिवस कसा असेल ते
AAP सत्तेत असतानाही आमदार टिकवणे कठीण जात होते, आता विरोधी बाकावर असताना ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. भाजप किंवा अन्य पक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतात. AAP हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीवर आधारित पक्ष नाही, तर तो सत्तेच्या उद्देशाने स्थापन करण्यात आला. त्यामुळे विरोधात असताना पक्ष एकसंध ठेवणे मोठे आव्हान असेल. २०१२ मध्ये केजरीवाल यांनी पक्ष स्थापनेसाठी “भ्रष्टाचारविरोधी पर्यायी राजकारण” हा मुद्दा मांडला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत AAP च्या भविष्यासाठी नवीन दिशा ठरवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.