भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Dobhal) हे एक कुशाग्र गुप्तहेर आणि संरक्षण तज्ञ म्हणून ओळखले जातात. काश्मीरपासून पंजाब आणि ईशान्येपर्यंत त्यांच्या कामाचं लोकं कौतुक करतात मिझोराममध्ये फील्ड मॅन म्हणून काम करत असताना अजित डोवाल यांचे भूमिगत झालेल्या लोकांशी चांगले संबंध होते. मात्र सध्या अजित डोवाल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी एका मुलाखती दरम्यान बंडखोरांबद्दल एक धक्कादायक बाब उघड केली आहे.
[read_also content=”दिल्लीत भरवस्तीतील थरार! चार जणांनी तरुणाच्या पायावर गोळी झाडून पाच लाख रुपये लुटले https://www.navarashtra.com/india/4-bike-borne-assailants-looted-5-lakh-rupees-from-man-and-shooted-on-his-leg-in-delhi-nrps-362582.html”]
टाइम्स ऑफ इंडियाने 2006 मध्ये अजित डोवाल यांची मुलाखत प्रकाशित केली होती. त्या मुलाखतीत डोवाल यांनी सांगितले की, त्यांनी एकदा मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते. लालडेंगा यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा तेव्हा अत्यंत धोकादायक मानला जात होता. बंडखोर जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्याजवळ अनेक शस्त्रे होती. त्यानंतर डोवाल यांनी ते सर्व सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.
लालडेंगा यांनी स्थापन केलेली मिझो नॅशनल फ्रंट 60 च्या दशकात सशस्त्र संघर्षासाठी ओळखली जात होती. लालडेंगा यांनी मिझो प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी 16 वर्षे गुरिल्ला चळवळीचे नेतृत्व केले. 1986 मध्ये भारत सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात मिझोराम शांतता करार झाला. 1966 मध्ये सुरू झालेल्या मिझोराममधील बंडखोरी आणि हिंसाचार संपवण्यासाठी हा अधिकृत करार होता.या करारानंतर, मिझो नॅशनल फ्रंट हा मिझोराममधील प्रबळ राजकीय पक्ष बनला आणि लालडेंगा मिझोरामचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांचा कार्यकाळ 1986 ते 1988 असा होता.
बीबीसीच्या एका अहवालात, कराचीतील भारताचे कौन्सुल जनरल जी. अजित डोवाल यांनीच नवाझ शरीफ यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला होता, असे पार्थसारथी यांचे म्हणणे आहे. 1982 मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. अजित डोवाल यांच्या सांगण्यावरून टीम लोहारला पोहोचली तेव्हा नवाझ शरीफ यांनी त्यांच्या घराच्या लॉनमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना मेजवानी दिली होती.