विमान प्रवास करणारे लोक फ्लाइटच्या वेळेबद्दल अत्यंत सावध असतात, परंतु असे बरेच प्रवासी आहेत जे सुरक्षा आणि सूचना दुर्लक्षित करुन उशीरानं विमानतळावर (Airport) पोहोचतात. विमानतळावर प्रवाशांना अनेक प्रकारच्या सूचना देण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे आपण सोबत बाळगलेल्या वस्तूंबद्दल असते. मात्र, सर्व सूचना देऊनही विमानतळावर अनेक प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जात असल्याच्या अनेकदा समोर येतं. आणि अशा घटना विमानतळावर रोजच घडतात. एवढेच नाही तर विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही अनेकदा शस्त्र घेऊन जाणाऱ्या प्रवाशांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का, विमानतळावर प्रवाशांकडून जप्त करण्यात येणाऱ्या सर्वाधिक वस्तू कोणत्या आहेत? (Most Probibited Item At Aiport) तर मग जाणून घ्या.
[read_also content=”चांद्रयान-3 बद्दल मोठी अपडेट! पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करत चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू! https://www.navarashtra.com/india/chandrayaan-3-completes-its-orbits-around-the-earth-and-heads-towards-the-moon-nrps-439342.html”]
देशातील 131 विमानतळांवर सुमारे 25 हजार प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाईटर्स आणि पॉवर बँक सर्वात वरच्या स्थानावर आहेत. झुल्फिकार हसन, डीजी, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांनी सांगितल की, हँड बॅगेमधील सर्वात जास्त जप्त केलेल्या वस्तूंपैकी लाइटर आहेत (ज्या तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्यासोबत ठेवता). तर, बहुतेक पॉवर बँक चेक-इन बॅगेजमध्ये जप्त करण्यात आल्या होत्या (प्रवासादरम्यान तुम्ही एअरलाइन्सना दिलेली सामग्री).
चेक-इन बॅगेजमध्ये जप्त केलेल्या इतर वस्तूंमध्ये बॅटरी आणि लॅपटॉपचा समावेश होता. तसेच कात्री, चाकू आणि द्रव समाविष्ट होते. नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या प्रगतीमध्ये सुरक्षेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्यात येतं. आकडेवारीनुसार, देशातील विमानतळांवर दररोज सुमारे 8 लाख हॅन्ड बॅगेज आणि 5 लाख चेक-इन बॅगेज तपासले जातात.
देशातील १३१ विमानतळांवर दररोज सरासरी १० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. सुरक्षा तपासणी बिंदूंवर सुमारे 11,000 स्क्रीनर बसविण्यात आले आहेत, जेथे 9 लाख हात बॅगांसह सुमारे 5 लाख प्रवाशांची तपासणी केली जाते.”तपासकर्त्यांना मदत करण्यासाठी सुमारे 600 बॅगेज एक्स-रे मशीन आणि 1,000 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) स्थापित करण्याता आले आहेत.