Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींचा वारसदार कोण असणार? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, जो कोणी असेल, तो आणखी जहाल….”

  • By युवराज भगत
Updated On: Feb 02, 2024 | 08:19 PM
Who is Narendra Modi's successor? Indicative statement by Prashant Kishor; Said, "Whoever is, he is more..."

Who is Narendra Modi's successor? Indicative statement by Prashant Kishor; Said, "Whoever is, he is more..."

Follow Us
Close
Follow Us:

Prashant Kishor on PM Modi : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताचा दावा भाजपाकडून केला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांकडून जागा कमी झाल्या तरी भाजपाचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे. तर काहींच्या मते या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून भाजपाला धोबीपछाड दिली जाऊ शकते. मात्र, अनेक चर्चांमधून एक समान प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपाकडे कोणता पर्याय आहे?

‘मोदी नाही तर कोण?

ज्याप्रकारे सध्या राष्ट्रीय राजकारणात ‘मोदी नाही तर कोण?’ असा प्रश्न केला जातो, तसाच आता ‘भाजपामध्ये मोदींनंतर कोण’ असा प्रश्न चर्चेत येऊ लागला आहे. नेमका याच मुद्द्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सविस्तर भाष्य केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले.

मोदी-शाह आणि वाजपेयी-आडवाणी!
यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी-अमित शाह व अटल बिहारी वाजपेयी-लालकृष्ण आडवाणी यांच्या कामाच्या पद्धतीची, विचारसरणीची आणि दृष्टीकोनाची तुलना केली. “तुम्ही सेहवाग आणि द्रविड एकाच वेळी असू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी एकाच वेळी असू शकत नाहीत.

ते दोघे एकाच विचारसरणीचे

त्या दोघींनी एकच पक्ष, एकच विचारसरणी, एकाच प्रकारच्या लोकांसोबत काम केलंय, पण दोघींचा करण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याचप्रमाणे मोदींचा दृष्टीकोन वाजपेयींपेक्षा वेगळा आहे. ते दोघे एकाच विचारसरणीचे असूनही त्यांची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे आता मोदी-शाहा अचानक वाजपेयींसारखे सर्वांच्या सहमतीने चालणारे होऊ शकत नाहीत. ते जे करत आले आहेत, तेच त्यांना करत राहावं लागणार आहे”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“भाजपाचा पुढचा पंतप्रधान मोदींपेक्षा जहाल”
“मला कुणीतरी विचारलं की मोदींचा वारसदार कोण असेल? मी नेहमी म्हणतो की ते कुणालाही माहिती नाही. कुणीही त्याबद्दलचा अंदाज बांधायला नको. पण एक मात्र नक्की आहे. जो कुणी त्यांच्यानंतर येईल, तो मोदींपेक्षा जास्त जहाल असेल. तेव्हा तुलनेनं मोदी भाजपाच्या पुढील पंतप्रधानापेक्षा जास्त मुक्त विचारांचे वाटू लागतील”, असं सूचक विधान यावेळी प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त जहाल

“सर्व भाजपाचे मुख्यमंत्री आज त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी भासवण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे आज मध्य प्रदेश किंवा राजस्थानचे मुख्यमंत्री सातत्याने त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त जहाल वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चालत आलं आहे. त्यामुळे त्या जागी जो कुणी येईल, त्याला तसं वागण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही”, अशी पुस्तीही यावर प्रशांत किशोर यांनी जोडली.

“योगींना मोदींच्या स्तरापर्यंत पोहोचायला अजून खूप अवकाश”
योगी आदित्यनाथ मोदींच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत असूननरेंद्र मोदींनंतर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार योगी असू शकतात, असं मानणारा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे. मात्र, असं मानल्यास ती चूक ठरेल, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे. “योगी अजिबात मोदींसारखे नाहीत. मोदींप्रमाणे योगी त्यांच्या स्वबळावर उत्तर प्रदेश जिंकून आणू शकत नाहीत. मोदी अजूनही मोठ्या संख्येनं मतं आकर्षित करणारे नेते आहेत. भाजपात इतरही नेते आहेत. पण त्यांच्यात आणि मोदींमध्ये खूप मोठं अंतर आहे”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

योगींच्या भरंवशावर उत्तर प्रदेशात निवडणूक
“तुम्ही मोदींना बाजूला करून फक्त योगींच्या भरंवशावर उत्तर प्रदेशात निवडणूक घ्या, त्यांना फार अडचणी येतील. वाजपेयी-आडवाणींच्या काळात मोदी गुजरातमध्ये खूप लोकप्रिय होते. पण त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी वाजपेयींची गरज होती. तीच स्थिती सध्या योगींची आहे. योगींचं मोठं नाव सध्या तयार होतंय, पण अजून त्यांना मोदींच्या स्तरावर पोहोचायला खूप अवकाश आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: Who is narendra modis successor indicative statement by prashant kishor said whoever is he is more nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 07:58 PM

Topics:  

  • Modi-Shah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.