बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक (satish kaushik) यांचा मृत्यू कार्डिॲक अरेस्टमुळे (cardiac arrest ) झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव, संगीतकार आणि गायक केके, भाभी जी घर पर है फेम मलखान उर्फ दीपेश भान इत्यादी सेलिब्रिटींना देखील कार्डिॲक अरेस्टमुळे प्राण गमवावे लागले. गेल्या अनेक दिवसापासुन कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घटतान दिसत आहेत. तसेच, रस्त्यावर फिरताना, जिममध्ये वर्कआऊट करताना किंवा लग्नात डान्स करतानाही कार्डिॲक अरेस्टमुळे तरुणांचा मृत्यू होत आहे. हे केवळ भारतातच नाही तर जगभरातघडत आहे. कार्डिॲक अरेस्टची प्रकरणे पूर्वी वृद्ध लोकांमध्ये दिसून येत होती. त्याच वेळी, आज तरुण लोक देखील याच्या विळख्यात आल्याचं दिसत आहे. त्यामुळे तज्ञांकडून जाणून घेतले की कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय, कार्डिॲक अरेस्टची लक्षणे काय आहेत? कार्डिॲक अरेस्टचा धोका कोणाला जास्त आहे? हे टाळण्यासाठी उपाय काय? चला तर मग जाणून घेऊया कार्डियाक अरेस्टशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, तर हे वाचाच!
[read_also content=”सतीश कौशिश मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट! जीथं होळी खेळली त्या फार्महाऊसमधुन मिळाली ‘आक्षेपार्ह औषधं’ https://www.navarashtra.com/crime/satish-kaushik-death-delhi-police-found-some-drungs-at-farmhouse-nrps-375262.html”]
आजतक दिलेल्या बातमीनुसार, गुडगावच्या आर्टेमिस हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ आणि अँजिओप्लास्टी हार्ट सर्जन डॉ. मनजिंदर संधू यांच्या मते, भारतातकार्डिॲक अरेस्ट झटका आलेल्या ३० टक्के लोकांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. डॉ. संधू यांनी दावा केला की कार्डिॲक अरेस्टमुळे भारतात दरवर्षी सुमारे 12 लाख तरुणांचा मृत्यू होतो आणि हा आकडा वाढत आहे. Lycée Heart Institute Hospital, Kochi चे कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. अजित थाचिल यांच्या मते, भारतात सुमारे 10 टक्के मृत्यू हे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होतात, जे जगातील मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. कार्डियाक अरेस्ट ही हृदयाशी संबंधित एक अतिशय धोकादायक स्थिती आहे. या अवस्थेत हृदय काम करणे थांबवते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो.
तसे, एखाद्या व्यक्तीला कार्डिॲक अरेस्टची लक्षणे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य उपचार करण्यास वेळ मिळत नाही. तज्ज्ञांच्या मते, कार्डिॲक अरेस्टमुळे शरीरात काही फरक दिसू लागतात. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास हृदयविकाराचा सामना केला जाऊ शकतो.
बेशुद्धी
जलद हृदय गती
छाती दुखणे
चक्कर येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
उलट्या होणे
पोट आणि छातीत दुखणे
बत्रा हार्ट सेंटरचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र कौल सांगतात की, 35-40 वयोगटातील लोकांमध्ये कार्डिॲक अरेस्टचे प्रमाण अधिक आहे. खाली 9 प्रमुख घटक आहेत जे 90 टक्के कार्डिॲक अरेस्ट किंवा हृदयाशी संबंधित आजारांसाठी जबाबदार आहेत. यापैकी दोन किंवा अधिक जोखीम घटकांमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हे घटक आहेत…
सिगारेट ओढणे
वाईट कोलेस्ट्रॉल
उच्च रक्तदाब
मधुमेह
मानसिक आणि सामाजिक ताण
वर्कआउट न करणं
लठ्ठपणा
भाज्या आणि फळे कमी खाणे
दारू पिणे
डॉ. विवेक कुमार म्हणाले की, ‘जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब, कौटुंबिक इतिहास, कोविड रिकव्हरी इत्यादी हृदयविकाराचा मुख्य धोका असू शकतो. जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, वजन नियंत्रणात ठेवत असेल, रक्तदाब नियंत्रित ठेवत असेल आणि कुटुंबातील एखाद्याचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू झाला असेल, वेळोवेळी डॉक्टरांना भेट दिली असेल, तर त्याला/तिला हृदयविकाराचा आणि कार्डिॲक अरेस्टचा धोका कमी असतो.
तसेच, यंगस्टर्स बद्दल बोलायचे झाल्यास क्षमतेपेक्षा जास्त काम करणे, जिममध्ये जाऊन वजन उचलणे, तासनतास व्यायाम करणे, धूम्रपान, मद्यपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेशी झोप न घेणे इत्यादी गोष्टींचा धोका वाढतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी दररोज 30-40 मिनिटे व्यायाम किंवा आठवड्यात 150-180 मिनिटे व्यायाम करणं आरोग्यदायी ठरतं. यासाठी व्यायामशाळेत जाणे आणि जड वजन उचलणे आवश्यक नाही. निरोगी राहण्यासाठी शरीराचे वजन व्यायाम किंवा जॉगिंग, धावणे, सायकल चालवणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यांचे व्यायाम देखील घरी किंवा पार्कमध्ये केले जाऊ शकतात.
तसेच, धूम्रपान-मद्यपानापासून दूर राहण हे सुद्धा आवश्यक आहे. किमान 7-8 तास पूर्ण झोप घेणही आवश्यक आहे. जर लवकर झोप येत नसेल, तर मोबाईलचा अतिवापर हे झोप न येण्याच मुख्या कारण आहे. रात्री झोपतान शक्यतो मोबाईलचा वापर टाळला की तुम्हाला तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल.