सौजन्य : Nirmala Sitharaman (X Account)
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानुसार, आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जात आहेत. त्यात महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. तसेच नव्या रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केल्या जात आहेत. देशात नवे कौशल्य विकास कोर्सेस सुरु केले जाणार आहेत. नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी तरूणांना कर्ज दिले जाणार आहेत. 20 लाख तरूणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. नव्या रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. MSME मुद्रा लोनचं लिमिट 10 लाखांवरून 20 लाख वाढवण्यात येणार आहे.
EPFO संदर्भात तीन नव्या योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मुद्रा लोनची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश राज्यासाठी भरघोस निधीही जाहीर करण्यात आला आहे. कृषी सहकारी संस्थांना बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाखांची मदत केली जाणार आहे.