Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याची १२ लक्षणे, सरकारने जारी केलेली यादी : वाचा सविस्तर

आरोग्य कर्मचारी आणि कोरोना लस घेणाऱ्या लोकांना अन्य लोकांना थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स बाबत जागरुक करा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केलीय. कोरोना लस घेतलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या यादीतील लक्षणं ही रक्त गोठण्याच्या समस्येबाबत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2021 | 08:02 AM
कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याची १२ लक्षणे, सरकारने जारी केलेली यादी : वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोना विषाणूपासून बचावासाठी सरकारकडून सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोविशील्ड लस घेतल्यानंतर काहीजणांना रक्त गोठण्याची समस्या दिसून येत आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्वाची सूचना आणि माहिती दिलीय. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना लस घेणाऱ्या लोकांना अन्य लोकांना थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स बाबत जागरुक करा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केलीय. कोरोना लस घेतलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या यादीतील लक्षणं ही रक्त गोठण्याच्या समस्येबाबत आहेत.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार खास करुन कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कुठली समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स हे लस घेतल्यानंतर साधारणपणे 20 दिवसांच्या आत दिसून येतात. या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केल्यास त्यांना याबाबत माहिती मिळेल आणि ते काळजी घेतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

ब्लीडिंग आणि क्लोटिंगच्या तक्रारी

कोरोनाची लस घेतल्यानंतर ब्लीडिंग (रक्त वाहणे) आणि क्लोटिंग (रक्ताच्या गाठी) होणं ही समस्या भारतात कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढल्यास थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या काही भागात कोविशील्ड लस घेतल्यानंतर थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. अशाच काही घटना 11 मार्च 2021 रोजी पाहायला मिळाल्या होत्या. अशा समस्या समोर आल्यानंतर सरकारकडून त्याबाबत पडताळणी करण्यात आली आणि त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे हा विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे.

तसेचं क्लोटिंग आणि ब्लीडिंगबाबत समितीने आपला अहवाल सादर केलाय. या अहवालात 498 गंभीर प्रकरणांवर अभ्यास करण्यात आलाय. त्यातील 26 केस थ्रोम्बोएंबोलिकशी संबंधित असल्याचं समोर आलाय. यामध्ये तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होता. तसंच या गाठी फुटून अन्य धमन्यांना नुकसान होण्याची शक्यता असते. असे प्रकार कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. असं असलं तरी त्याचा दर प्रति 10 लाख डोसमध्ये 0.61 टक्के आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन लसीबाबतही अशी लक्षणं आढळून आली आहेत. पण ती गंभीर नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

भारतात समस्यांचे प्रमाण कमी

थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सच्या तक्रारी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये जास्त प्रमाणात समोर आल्या आहेत. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये पाहिला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते युरोपीय देशांच्या तुलनेत दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये या समस्या कमी आहेत. भारतात या समस्या आढळून आल्या आहेत, मात्र लक्षणं गंभीर नाहीत. मात्र, नागरिकांनासाठी राज्य सरकारने एक जनजागृती अभियान राबवलं आहे.

[read_also content=”मोदी सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ ताली-थाली बजाव आंदोलन करणार; बच्चू कडू यांचा ईशारा https://www.navarashtra.com/latest-news/modi-governments-protest-against-fertilizer-price-hike-bachchu-kadus-hint-nrdm-130642.html”]

थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्समध्ये आढळणारी लक्षणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत दुखणे
  • हात दुखणे
  • इंजेक्शन केलेल्या जागेच्या बाजूला त्वचेवर लाल डाग उठणे
  • उलटी होणं आणि पोटात दुखणे किंवा फक्त पोटात दुखणे
  • शरिरावर रेषा उमटणे
  • उलटी आणि डोकं दुखणं किंवा फक्त डोके दुखी
  • अशक्तपणा, हात किंवा शरीराच्या अन्य भागाला पॅरालिसिस (चेहऱ्यावरही)
  • विनाकारण उलटी होणे
  • नजरेसमोर अंधारी येणं, डोळे दुखणे किंवा वस्तू दोन-दोन दिसणे
  • मानसिक स्थितीत बदल, कन्फ्युजन किंवा डिप्रेशन

Web Title: 12 symptoms of blood clots after corona vaccine list issued by the government read more nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2021 | 08:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.