मुंबई : १२वीची परिक्षा (12th board exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आज सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षेसाठी हॉलतिकीट देण्यात येणार आहे. दरम्यान हे हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांत राज्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्यावरून वाद सुरू होता. परंतू परिक्षा ऑफलाईनच होतील असं नंतर जाहीर करण्यात आलं. तर आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे.
परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात असं विद्यार्थ्यांचं मत होतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे काल बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा पूरेसा अभ्यास झालेला नव्हता. तेसच मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी करण्यात येत होती. विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं. व शासनावर दबाब आणण्याचाही प्रयत्न केला. परंतू बोर्डाने ऑफलाईनवरच ठाम राहण्य़ाचा निर्णय़ घेतला. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि परीक्षेच्या नियोजनाला पुरसा वेळ मिळाला आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.