Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनामुळे जिल्ह्यातील २५० नवउद्योग ठप्प; मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे बँकाकडे प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित

राज्यात उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (The Chief Minister's Employment Generation Program) राबविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्जाचे प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील 250 नवउद्योग मागील एक वर्षापासून ठप्प आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 17, 2021 | 10:01 PM
कोरोनामुळे जिल्ह्यातील २५० नवउद्योग ठप्प; मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे बँकाकडे प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित
Follow Us
Close
Follow Us:

वर्धा (Wardha).  राज्यात उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (The Chief Minister’s Employment Generation Program) राबविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्जाचे प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील 250 नवउद्योग मागील एक वर्षापासून ठप्प आहेत. त्यामुळे नवव्यवसायात उतरणा-यांना अनेक युवकांचा हिरमोड झाला आहे.

[read_also content=”देवळी/ ५०० सिलेंडर उत्पादनक्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण; प्राणवायू प्रकल्पामुळे लाखो प्राण वाचतील- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी https://www.navarashtra.com/latest-news/union-minister-nitin-gadkari-dedication-of-500-cylinder-production-oxygen-plant-the-oxygen-project-will-save-millions-of-lives-nrat-130375.html”]

राज्यस्तरीय योजना छोट्या व्यावसायिकांसाठी यावर्षी बंद करण्यात आलेल्या आहेत. तर सीएमईजीपी व पीईएमईजीपी या योजना सुरू आहेत. मागील वर्षभरापासून लाँकडाऊन सुरू असल्याने त्याचा छोट्या उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय काही मध्यम उद्योगांनी कर्मचारी कपात केल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. वर्धा शहरासह जिल्ह्यातील अनेक शाखांमध्ये कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे बँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडे कर्जप्रस्ताव सादर केले आहेत. पण, मागील एक ते दीड वर्षांपासून प्रस्तावांना मंजुरी मिळाली नसल्याने अनेक नवीन उद्योगनिर्मिती ठप्प असल्याचे दिसते.

जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 200 प्रस्ताव तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 50 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बँकांकडे पाठपुरावा सुरू आहे, पण कोविडमुळे कर्मचारी कमी असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्वच बँकामध्ये कोरोनाच्या संसर्गाने कर्मचारी संख्या कमी असल्याने नव उद्योजक होऊ पाहणा-या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रस्तावाकडे बँकांनी लक्ष दिलेले नाही.

शहरातील युवक ग्रामीण भागाकडे
कोरोनामुळे मोठ्या शहरात नोकरी करणा-या अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या. त्यामुळे बहुतांश जणांच्या रोजगारावर पाणी फेरले आहे. त्याचा परिणाम मुंबई, पुणे नागपूर या मोठ्या शहरातील युवक आता ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत. अशापैकी वर्धा जिल्ह्यातील जवळपास 10 ते 20 टक्के बेरोजगार युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे व्यवसाय उभारणीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

यावर्षीचे टार्गेट आलेच नाही
जिल्ह्यात विविध रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यावर्षी बँकांना टार्गेटच देण्यात आलेले नाही. शासनाकडून 2021-22 या वर्षाचे टार्गेट येणे बाकी असल्याने बँकांही संभ्रमात आहेत. गतवर्षीचे प्रस्ताव बँकाकडे अधिच प्रलंबित आहे.

कडक निर्बंधामुळे अनेक उद्योग बंद
राज्यासह वर्धा जिल्ह्यातही कडक निर्बंध लागू केल्यामुळे उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने अनेक लहान-मोठे उद्योग बंद होताना दिसत आहेत. उत्पादन करण्यासाठी जवळचे भांडवल गुंतवूनही उत्पादित केलेला माल विक्री करण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी उद्योगच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम लाँकडाऊनमुळे अनेक उद्योगांना टाळे लागल्याचे दिसून येते.

Web Title: 250 new industries in the district stalled due to corona cm job creation proposal pending with the bank for over a year nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2021 | 10:01 PM

Topics:  

  • Small Business

संबंधित बातम्या

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड
1

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड

३,८००+ ई-क्लिनिकद्वारे गावापर्यंत पोहचणार आरोग्यसेवा, करण्यात आली भागीदारी
2

३,८००+ ई-क्लिनिकद्वारे गावापर्यंत पोहचणार आरोग्यसेवा, करण्यात आली भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.