Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाच्या भीतीने ५५ टक्के लोक भीतीग्रस्त तर २७ टक्के लोक नैराश्यग्रस्त; कसा कराल मानसिक महामारीचा मुकाबला ?

देशात कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) त्सुनामीसारखी (Tsunami) आली आहे. कुटुंबच्या कुटुंब सध्या कोरोना संक्रमित आहेत. आरोग्य व्यवस्था (The health system) कोलमडून पडल्याचे दिसते आहे, व्यवस्था, सरकारी यंत्रणा (the government system) दिसेनाशी झाली आहे, किंवा अपुरी पडताना दिसते आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 11, 2021 | 06:03 PM
कोरोनाच्या भीतीने ५५ टक्के लोक भीतीग्रस्त तर २७ टक्के लोक नैराश्यग्रस्त; कसा कराल मानसिक महामारीचा मुकाबला ?
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली (Delhi).  देशात कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) त्सुनामीसारखी (Tsunami) आली आहे. कुटुंबच्या कुटुंब सध्या कोरोना संक्रमित आहेत. आरोग्य व्यवस्था (The health system) कोलमडून पडल्याचे दिसते आहे, व्यवस्था, सरकारी यंत्रणा (the government system) दिसेनाशी झाली आहे, किंवा अपुरी पडताना दिसते आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये नैराश्य आणि तणावाचं वातावरण (atmosphere of depression and tension) पाहायला मिळते आहे. मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्राचे (psychiatrists and psychologists) अभ्यासक यांच्याकडे असणारी आकडेवारी ही भीतीदायक आहे. कोरोनाने समाजात मोठा बदल घडवला आहे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. एकूण एक नवी मानसिक महामारी (A new mental epidemic) समोर येते आहे.

[read_also content=”नागपूर/ लस पुरवठ्यामध्ये राज्य सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा महापौर तिवारी यांचा आरोप; नागपुरकरांना प्रतीक्षा लसिकरणाची ! https://www.navarashtra.com/uncategorized/mayor-tiwari-alleges-that-the-state-government-is-discriminating-in-the-supply-of-vaccines-nrat-127369.html”]

कोरोनाच्या स्थितीतून गेलेले नैराश्याच्या गर्तेत
मॅक्स हॉस्पिटलच्या मनसोपचार विभागातर्फे काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. यात देशभराती हजार जणांनी सहभा नोंदवला. यातील ५५ टक्के जण हे भीतीग्रस्त असल्याचे तर २७ टक्के जम हे नैराश्यग्रस्त असल्याचे आढळून आले. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नसल्याने अनेक जण घाबरलेले आहेत. आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर ही वेळ ओढवली तर काय करायचं, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. फक्त कोरोना झालेलेच नाहीत, तर ज्यांनी या संकटात जीवलग, कुटुंबातील सदस्य गमावले आहेत, असेही नैराश्याच्या गर्तेत आहेत.

कोरोना महामारीमुळे सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. सरकार या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करते आहे. यामुळे बाजारपेठा कधी सुरु होणार, नोकऱ्यांचं काय, याबाबत सगळ्यांमध्येच अनिश्चितता आहे. पुढचं भविष्य काय हे माहित नसल्याने, अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. जनता मनातून घाबरलेली असल्याने, अनेक जण घबराटीतून जास्त खरेदी करीत आहेत. ज्या वस्तू गरजेच्या नाहीत, अशा वस्तूंची खरेदीही वाढली आहे. ज्या औषधांवर आत्तापर्यंत त्यांचा विश्वास नव्हता, अशी औषधे खरेदी करण्याकडेही कल वाढला आहे. जर अशी सामूहिक घबराट निर्माण झाली, तर नैराश्याच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची भीती आहे.

सोशल मीडियातून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळेही नैराश्याच्या गर्तेत भर पडते आहे. अनेकांना बेड्स मिळत नाहीत, बेडसाठी वणवण हिंडावे लागते आहे, कुठे प्लाझ्माची गरज आहे, या सगळ्या बातम्या व्हॉट्सग्रुपच्या माध्यमातून सगळे बघत आहेत, वाचत आहेत. याचा परिणाम सगळ्यांच्याच मनावर होतो आहे. यामुळे सगळ्यांच्या मनात गोँधळात स्थिती निर्माण झाली आहे.
या कोरोनाच्या लाटेत अनेक जम मृत्यमुखी पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी ज्याच्याशी बोलत होतो, त्याच्या मृत्युमुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. कुटुंबातील सदस्य कोरोनाने अचानक गेल्याने अनेक जण नैराश्यात आहेत.

यामुळे अनेकांच्या मनात संताप, अपूर्णतेची भावना आणि नैराश्य येते आहे. अनेक जम सात्तत्याने आपली ऑक्सिजन लेव्हल चेक करीत आहेत, यामुळेही नैराश्यात भर पडते आहे. अनेकांची रात्रीची झोप गेली आहे. रात्री ते झोपेतून दचकून उठतायेत, अनेकांच्या ह्रद्याचे ठोके वाढत हेत. तर काही जणांना घबराटीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. या सगळ्यांना पल्याला कोरोनाची लक्षणे आहेत, ही भीती मनात पछाडते आहे. यामुळे सातत्याने ऑक्सिजन लेव्हल चेक करण्याची सवय सगळ्यांनाच लागली आहे.

या तणावामुळे आजारासारखी स्थिती निर्माण झाली आहे. एका आठवड्याहून अधिक काळ सगळेच जण अस्वस्थ आहेत, त्याचा परिणाम दैनंदिन कामांवर होतो आहे. कामात एकाग्रता होत नाहीये, छोटी-छोटी कामेही दडपम वाढवीत हेत, एवढ्यातेवढ्याश्या गोष्टींनी डोळे भरुन येण्याचे प्रमाम वाढले आहे. घाबरल्याने मनात नकारात्मक विचारांची गर्दी वाढली आहे, मी बेकार आहे, आणि आता काही होऊ शकत नाही, अशी भावना वाढीस लागली असेल, तर हे नैराश्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत असहाय्य आणि एकटेपणा जाणवतो आहे.

तरुण, मध्यम वयाचे, निवृत्त झालेल्या सगळ्यांनाच हा नैराश्याचा फटका कमी-अधिक प्रमाणात जाणवतो आहे. अनेकांना आपल्या भावी आयुष्याचे प्रश्न सतावत आहेत. तरुणांना नव्या संधी थांबलेल्या दिसतायेत, याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे. तर पन्नाशीच्या पुढच्या वयोगटात कटेपणाची भावना वाढीला लागताना दिसते आहे. या नैराश्यावर आत्ताच मात केली नाही, तर पुढे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

लोकांमध्ये विषाणूंबाबत भीती निर्माण झाली आहे, कोरोनाच्या बातम्यांची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे व्हॉट्स्पसारख्या माध्यमातून येणाऱ्या अवैद्यकीय उपाययोजनाही त्यांना जवळच्या वाटू लागल्या आहेत, त्यावर ते विश्वास ठेवू लागले आहेत. सावधगिरी बाळगणे योग्य आहे, पण या सावधगिरीचे रुपांतर घबराटीत होणे चुकीचे आणि धोक्याचे असल्याचे डॉक्टर सांगतायेत. नकारात्मक बातम्यांचा परिणाम कोरोना रुग्णांच्या मनोवस्थेवरही होतो आहे.

नैराश्यावर काय उपाय
नैराश्यावर मात करण्यासाठी नकारात्मक विचारांना तिलांजली देणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार हेच नैराश्याचे उगमस्थान आहे. दररोज आपल्या मनात साधारणपणे ६० हजार विचार येतात. हे आपल्याच बाबतीत का होते, असा प्रश्नही आपल्याला पडतो. त्यामुळेच आपम नैराश्याच्या गर्तेत अधिक अडकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नकारात्मक विचार थांबवणे, हेच यावरचे उत्तर असल्याचे डॉक्टर सांगतायेत. जर आपण जास्त विचार करतो आहोत, असे लक्षात आले तर विचार करणे थांबवा असा सल्ला डॉक्टर देत आहेत. जास्त विचार केल्याचा परिणाम आपल्या शरिरावरही होतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आव्हानांचा मुकाबला करत, पुढे जात राहणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. मनुष्य प्राणी या संकटातूनही याच पद्धतीने पुढे जातील, यावर डॉक्टरांना विश्वास आहे. जसजसा काळ पुढे जील, आपमया संकटांवर मात करत राहू, तसतसे नकारात्मक विचार, नैराश्य मागे जात राहील, यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. सध्याची परिस्थिती दीर्घकालीन नैराश्यात बदलू नये, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. एक मा६ नक्की आहे की, या संकटानंतर माणसांच्या विचारात आणिसमाजात मोठा बदल होणार आहे. येणाऱ्या काळात नकारात्मक विचार मागे पडतील, यावर डॉक्टरांना विश्वास आहे.

Web Title: 55 percent of people are scared of coronas and 27 percent are depressed how to deal with mental illness nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2021 | 06:03 PM

Topics:  

  • Mental Illness

संबंधित बातम्या

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
1

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.