महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना देशभरातीलही कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ९७५ नव्या कोरोना रुग्णांची (Corona Cases In Country) नोंद करण्यात आली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी देशात ९४९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर असून सहा जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण मृतांचा आकडा ५ लाख २१ हजार ७४७ वर पोहोचला आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ३६६ इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
[read_also content=”सोलापूरच्या निलेशने अखेर दिल्ली गाठली, मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांची घेतली भेट https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/nilesh-from-solapur-finally-reached-delhi-where-he-met-chief-minister-arvind-kejriwal-269580.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ३६६ इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ७४७ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख ७ हजार ८३१ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०३ टक्के इतका झाला आहे.
[read_also content=”मनसेकडून सामना कार्यालयाबाहेर बॅनरबाजी, संजय राऊत तुमचा कर्कश भोंगा बंद करा, नाहीतर मनसे स्टाईलनं उत्तर देऊ मनसेचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/mns-banner-waving-outside-the-match-office-sanjay-raut-turn-off-your-horn-269568.html”]