बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; आतापर्यंत 7 ठार, 13 जण गंभीररित्या जखमी
अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला यात बालकाचा मृत्यू झाला. ह्रदयद्रावक घटनेने राहाता (Rahata) तालुक्यातील चितळी गावात शोककळा पसरली आहे. तर वनविभागाच्या (Forest Department) हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी गावात मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला चि.प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) झेप घेत क्षणार्धात त्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धूम ठोकली.
बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या (Leopard) दिशेने धावले. मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळींब (Pomegranate) व मका (Maize) इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले. यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर (Shrirampur) येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर यांनी मृत घोषित केले.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बिबट्याच्या (Leopard) हल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात उसाचे (Sugarcane) क्षेत्र तसेच डोंगराळ प्रदेश मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा (Wild animal) वावर कायमच नागरी वस्तींमध्ये दिसून येतो. गेला काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील एका दांम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला होता तर नगर (Ahmednagar) शहरासारख्या भर वस्तीत बिबट्यांचा वावर आढळून आला. अकोले तालुक्यात देखील बिबट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. यातही काही बिबटे ( Leopard) पकडण्यात वन विभागाला यश आले तर काही बिबटे त्यांच्या हातातून निसटले. त्यामुळे वनविभागाच्या (Forest Department) या सुस्त कारभारावर जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.