मुंबई (Mumbai). रायगडमध्ये (Raigad) पुरस्थितीमुळे उडालेल्या हाहाकारानंतर येथे मदतकार्य (Relief work) सुरु झाले आहे. मुंबई महापालिकेची पथके (Mumbai Municipal Corporation teams) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोकणात पोहचली आहेत. मुंबईतून बेस्टचे तंत्रज्ञ (BEST technicians) आणि देवनार पशू वधगृहाच्या डॉक्टरांचे पथक रायगडमध्ये दाखल झाले आहेत. अडकलेली वाहने काढण्यासाठी आणि जनावरांवर उपचार करण्याचे काम या पथकांकडून सुरु झाले आहे.
[read_also content=”मुंबई/ विहार, तुळशी आणि पवई धरणांच्या मजबुतीकरणाच्या सल्ल्यासाठी पालिका माेजणार १ काेटी २३ लाख रुपये https://www.navarashtra.com/latest-news/municipal-corporation-to-raise-rs-1-lakh-23-lakhs-for-strengthening-of-vihar-tulshi-and-powai-dams-nrat-161257.html”]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पालिकेने ही कार्यवाही सुरु केली आहे.
मुसळधार पावसामुळे कोकणात आलेल्या पुरामुळे मोठी जिवीतहानी व आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो वाहने चिखलात अडकून पडली आहेत. शिवाय अनेक दिवस साचून राहिलेले पाणी, चिखल यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे पालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे पशुवैद्यकीय अधिकारी व स्वच्छता कर्मचारी असा एकूण २३ जणांचा चमू रायगड येथे दाखल झाला आहे. जखमी जनावरांवर उपचार व त्यांचे रोग प्रतिबंधात्मक लसीकरण या पथकाद्वारे करण्यात येत आहे. तर, स्वच्छता कर्मचाऱ्यांनामार्फत ठिकठिकाणी फवारणी करणे व स्वच्छता करणे, ही कामे केली जात आहेत.
पालिकेची अद्ययावत सेवा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोकणात दाखल झाली असून मदतकार्य सुरु झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन मदत कार्याकरिता बेस्टची रेकर कम टोईंग व्हॅन पर्यवेक्षक गवस, मेकॅनिक तावडे, भट, चालक मेरे, फरांदे, आणि स्वच्छक मनावे, कदम यांच्यासह तातडीने पाठवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.