मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या (Amir Khan)प्रत्येक सिनेमाची उत्सुकता असते. त्याचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय? याकडे देखील लक्ष लागून होत . आणि आता या सिनेमाची उत्सुकता संपली आहे. आज आमिर खाननं सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. येत्या 14 एप्रिलला लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, केजीएफ 3 (KGF 3) आणि पुष्पा 2 (Pushpa 2) यांसारख्या चित्रपटामुळं लाल सिंह चड्ढाच्या प्रदर्शनाच्या तारिखेत बदल करण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु, दाक्षिणात्य चित्रपटांच्या या वादळासमोर ‘लाल सिंग चड्ढा’ झुकणार नसल्याचं आमिर खानच्या पोस्टमुळं स्पष्ट झालंय.