Environment and Tourism Minister Aditya Thackeray on a two-day visit to Vidarbha
मुंबई : शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज सिंधुदुर्ग जिह्याच्या दौरा करणार आहेत. सिंधुदुर्गातील पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्यासाठी तेथील नैसर्गिक साधनसामुग्री आणि सोयीसुविधांचा आढावा ते घेणार आहेत. अत्याधुनिक स्कूबा बोटीचे लोकार्पणही यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरे यांचे आज दुपारी 2च्या सुमारास चिपी विमानतळावर आगमन होईल. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जलक्रीडा प्रकार, समुद्रकिनाऱयांचा विकास त्याचप्रमाणे कृषी, जल व अन्य पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यादृष्टीने आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱयात आदित्य ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
[read_also content=”एअर इंडियाचे नवे सीईओ इल्कर अयासी यांची गृह मंत्रालय करणार चौकशी , सरकार घेऊ शकते रॉची मदत https://www.navarashtra.com/india/home-ministry-will-investigate-air-indias-new-ceo-ilkar-ayasi-government-can-take-help-of-raw-242295.html”]