Airtel ने 5G युजर्ससाठी 3 नवीन प्लॅन्स लाँच केले
भारतात प्रमुख तीन टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्यामध्ये एअरटेलचाही समावेश आहे. त्यातच आता अलीकडेच तिन्ही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. अलीकडेच तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळेच आता या दरवाढीमुळे अनेक युजर्स निराश झाले आहेत.
मात्र आता ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी एअरटेलने तीन नवीन डेटा बूस्टर प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपये अशी आहे. 5G युजर्ससाठी आता हे नवीन प्लॅन्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळत असलेल्या बेनेफिट्सविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.
या प्लॅनसह आता रोज 1GB किंवा 1.5GB डेटा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना काही रुपयांमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा घेता येणार आहे. तुमचा बेस प्लान काहीही असो, रु. 51, रु. 101 किंवा रु. 151 चे बूस्टर पॅक ऍक्टिव्ह केल्याने तुम्हाला तुमच्या विद्यमान प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या डेटासह अनलिमिटेड 5G डेटाचा ऍक्सेस मिळेल.
हेदेखील वाचा – ऑनलाईन रेल्वे तिकीट कसे बुक करावे? या टिप्स फॉलो करा