बाजीप्रभूंची भूमिका साकारणं हा एक थरारक अनुभव – अजय पुरकर
‘पावनखिंड’(Pawankhind)चित्रपटामध्ये बाजीप्रभूंची(Bajiprabhu Deshpande) भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अजय पुरकर (Ajay Purkar Interview) यांनी प्रचंड मेहनत घेतली. बाजीप्रभूंसारखी शरीरयष्टी दिसावी म्हणून व्यायामावर त्यांनी खूप लक्ष दिलं. पावनखिंडसाठी दांडपट्टा, विटा या शस्त्रांचं अजय पुरकरांनी खास प्रशिक्षण घेतलं आहे. बाजीप्रभूची भूमिका साकारतानाचा अनुभव खूप थरारक होता, असं त्यांनी सांगितलं आहे.