amarnath yatra
कोरोना संसर्ग(Corona Spread) कमी झाला असला तरी तिसरी लाट(Third Wave) येण्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द(amarnath Yatra Cancelled) करण्यात आली आहे. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाईन दर्शन घेता येणार आहेत.
[read_also content=”मुंबईत मराठीतून शिक्षण घेणे गुन्हा आहे का ? भाजप शिक्षण समितीचा सवाल https://www.navarashtra.com/latest-news/bjp-education-committiee-asked-is-it-a-crime-to-take-education-in-marathi-medium-nrsr-145443.html”]
भाविकांना बाबा बर्फानींचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहेत. हिमालयाच्या उंच भागात ३८८० मीटर उंचीवर असलेल्या भगवान शंकराच्या गुफा मंदिरात ५६ दिवसासाठी यात्रा २८ जून रोजी पहलगाम व बालटालमार्गे सुरू होणार होती. तसेच २२ ऑगस्टला यात्रा संपणार होती.
J&K Govt has decided to cancel Shri Amarnath Ji Yatra; all the traditional religious rituals to be performed at the Holy Cave Shrine as per past practice: Shri Amarnath Ji Shrine Board — ANI (@ANI) June 21, 2021
यापूर्वी एप्रिल महिन्यात अमरनाथजी श्राईन बोर्डानं पवित्र गुफेची यात्रा रद्द करणार असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात पत्रकही जारी करण्यात आलं होतं. परंतु काही वेळानंचं जम्मू काश्मीर माहिती संचालनालयानं यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. फक्त देशातून नाही तर जगभरातून लोक अमरनाथ यात्रेसाठी येत असतात.
यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविकांसाठी बोर्डानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पाडले जाणार असल्याचं जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.