नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता संर्घषाबात सवोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्याच्या राजकारणाच्या संर्घषाची ही सुनावणी विस्तारित पीठाकडे किंवा घटनापीठाकडे जाणार का? आणि निवडणूक आयोगाच्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार का? या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
[read_also content=”आमदार, खासदारानंतर एकनाथ शिंदेंचा आता मुंबईतील नगरसेवकांवर डोळा? https://www.navarashtra.com/maharashtra/mla-and-mp-after-mumbai-corporters-next-traget-for-cm-eknath-shinde-311062.html”]
महाराष्ट्रातल्या सत्तासंर्घाबाबतच्या या महत्त्वाच्या प्रकरणी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ उद्या या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्चा न्यायालय उद्या करणार.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी.
गटनेता, व्हिप म्हणून विधानसभा, लोकसभेत शिंदे गटाने केलेल्या नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी.[
उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव वैध की अवैध याचाही निर्णय कोर्टाला करावा लागेल.
सोबतच निवडणूक आयोगातही ही लढाई पोहोचली आहे, 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना उत्तर द्यायचं होतं. पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या नोटिशीला स्थगिती द्या अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे.