ananya pandey
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या मालदिवमध्ये नव्या वर्षाचा आनंद घेत आहे. मालदिवमध्येच तीने नववर्षाचं जोरदार स्वागत केलं. मात्र सध्या सोशल मीडियावार अनन्याच्या बिकीनी लूकचीच चर्चा रंगली आहे. अनन्याचा बिकीनी लूक बघून तुम्हीही क्लीन बोल्ड व्हाल.
अनन्याने नव वर्षाचं स्वागत करताना दोन हॉट फोटो शेअर केले आहेत. प्रकाशाकडे बघतेय. हॅलो २०२१ असं कॅप्शन तीने या फोटोला दिलं आहे. अनन्याचा हा बोल्ड अंदाज बघून चाहते फिदा झाले आहेत. वर्षा अखेरीस अनन्याची बोल्डनेसची सुरू झालेली चर्चा अद्याप सुरू आहे.
अनन्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. ती चाहत्यांसाठी आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. चाहतेही या फोटोंना भरभरून दाद देतात.
अनन्या शेवटची खालीपिली या चित्रपटात दिसली. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. अनन्याने स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती पती पत्नी और वोमध्ये झळकली होती.
या दोन्ही चित्रपटात तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. लवकरच अनन्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. लवकरच ती साऊथच्या फायटर या चित्रपटात दिसणार आहे.