Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईत भाजपला धक्का; नगराध्यपदी अनिल सावंत, राष्ट्रवादीच्या गोटात जल्लाेष

वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादीपुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष असलेले अनिल सावंत य‍ांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 05, 2021 | 04:27 PM
वाईत भाजपला धक्का; नगराध्यपदी अनिल सावंत, राष्ट्रवादीच्या गोटात जल्लाेष
Follow Us
Follow Us:

वाई : वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादीपुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष असलेले अनिल सावंत य‍ांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्रधिकरणाच्या सदस्य होण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा पदभार नियमानुसार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वीकारला. मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी यांनी त्यांना नगराध्यक्षपदाचा पदभार सुपूर्त केला.

य‍‍ावेळी नगराध्यक्ष सावंत म्हणाले, आमदार मकरंद पाटील य‍ांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या काळात नगराध्यक्ष काय काम करू शकतो हे निश्चित समजेल असे काम करु. प्रलंबित विकासकामे व वाईच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मिळालेल्या संधीला योग्य न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न करु, असे ते म्हणाले.

नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्याने सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक प्रदिप चोरगे, चरण गाकवाड, भारत खामकर, किशोर बागुल, राजेश गुरव, संग्राम पवार, दिपक ओसवाल, ऍड. श्रीकांत चव्हाण, कांताराम जाधव, सिमा नायकवडी, शितल शिंदे, स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, आरती कांबळे, मनिष भंडारे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे, विकास जाधव आदींसह अनेकजण उपस्थित होते. त्यांचे र‍ाष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुछ, शाल श्रीफळ देऊन तसेच फोन करून अभिनंदन केले.

Web Title: Anil sawant as the mayor of wai municipality nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2021 | 04:27 PM

Topics:  

  • Anil Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.