अहमदनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात संपूर्ण देशात जनजागृती निर्माण करणाऱ्या अण्णा हजारे यांच्या माजी स्वीय सहायकाच्या कंपनीने गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. टँकरने पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून पारनेर तालुक्यातील साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Anna Hazare’s PA, who has been raising awareness against corruption all over the country, has become a bribe taker; Filed a case against the company of a former PA).
ही कंपनी हजारे यांचे एकेकाळचे स्वीय सहायक व सध्याचे कार्यकर्ते उद्योजक सुरेश पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे. गैरव्यवहार उघडकीस आणणारे रामदास घावटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट हजारे यांची भेट घेतली. या कंपनीशी संबंधित काही संचालक राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी घावटे यांनी केली. यावर आता हजारे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 2019 मध्ये दुष्काळामुळे पाणी टंचाई होती. त्यामुळे प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा केला. या कालावधीत पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्याची चौकशी झाली. तथ्य आढळून आल्याने कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही कंपनी राळेगणसिद्धी येथील पठारे, निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समुहाचे मच्छिंद्र लंके, अभय औटी, दादाभाऊ पठारे, नितीन अडसुळ, विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची आहे.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी यासंबंधी तक्रार दिली होती. या तक्रारीचा त्यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून तशी माहिती घावटे यांना कळविण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करावी. त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, अशी मागणी आता घावटे यांनी केली आहे.
घावटे यांनी हजारे यांचीही भेट घेतली. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. यामध्ये गुन्हे दाखल झालेल्यांपैकी काही व्यक्ती राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत, त्यांचा राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणीही घावटे यांनी हजारे यांच्याकडे केली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने खेपा कमी करून जास्त दाखवल्या. वाहतुकीच्या आंतरातही घोळ केला. अन्य त्रुटीही राहिल्या आहेत. अशा पद्धतीने हा गैरव्यवहार टँकर घोटाळा केल्याचा आरोप लोकजागृती शोध प्रतिष्ठानने तक्रारीत केला आहे. त्यानुसार सरकाराने त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]