Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने नाव प्रवाहात वाहत गेली; ३ मुलींचा बुडून मृत्यू

वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील वाघोली घाटावर मंगळवारी (१८ मे) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. समृद्धी ढीवरू शेंडे (वय ११), सोनी मुखरू शेंडे (वय १३) दोघीही रा. वाघोली व पल्लवी रमेश भोयर (वय १३) रा. येवली अशी मृतक मुलींची नावे आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 09:34 PM
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने नाव प्रवाहात वाहत गेली; ३ मुलींचा बुडून मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली (Gadchiroli).  वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील वाघोली घाटावर मंगळवारी (१८ मे) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. समृद्धी ढीवरू शेंडे (वय ११), सोनी मुखरू शेंडे (वय १३) दोघीही रा. वाघोली व पल्लवी रमेश भोयर (वय १३) रा. येवली अशी मृतक मुलींची नावे आहेत.

[read_also content=”यवतमाळ/ म्युकरमायकोसिसने आणखी एका रुग्णाचा मृत्यू: रुग्णसंख्या वाढतीवर असल्याचे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली https://www.navarashtra.com/latest-news/another-patient-dies-of-myocardial-infarction-the-district-administration-is-concerned-that-the-number-of-patients-is-on-the-rise-nrat-130885.html”]

पल्लवी भोयर ही मुलगी आपल्या आजीकडे राहण्यासाठी वाघोली येथे आली होती. पल्लवी भोयर आणि अन्य दोन मुली केवळराम शेंडे यांच्यासोबत आंबे आणण्यासाठी वैनगंगा नदीपलीकडे असलेल्या जुनासूर्ला ता. मूल जि.चंद्रपूर येथे जाण्यासाठी वैनगंगा नदीच्या वाघोली घाटावरून नदीच्या प्रवाहातून नावेने जात होत्या. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने नाव प्रवाहात वाहत गेली व लाटांमुळे नाव पाण्यात उलटली. यामध्ये तीनही मुली खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोमेश भोयर, संतोष गेडाम, रवी भोयर व मुखरू ठाकूर यांनी नदीपात्रात शोध घेत मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. यामध्ये नाव चालक केवळराम शेंडे याला पोहता येत असल्याने त्याने दुसऱ्या घाटाकडे भीतीने पळ काढला. यातील सोनी शेंडे ही इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी होती. या घटनेची माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याला मिळताच पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास चामोर्शीचे पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, पोलिस हवालदार गंफलवार, सुरेश तागडे करत आहेत. घटनेमुळे वाघोली गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Web Title: As the water level in the river basin was high the boat floated in the current and the boat capsized due to the waves 3 girls drowned nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 09:34 PM

Topics:  

  • Drowning in Lake

संबंधित बातम्या

पाषाणे येथील धरणात बुडून दिघातील तरुणाचा मृत्यू; आंघोळीसाठी पाण्यात उतरला अन्…
1

पाषाणे येथील धरणात बुडून दिघातील तरुणाचा मृत्यू; आंघोळीसाठी पाण्यात उतरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.