
फोटो सौजन्य- pinterest
लोकांना अनेकदा रस्त्यावर पडलेले पैसे आढळतात. ते आपण उचलतो देखील. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर सापडलेले पैसे हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचे लक्षण आहे. जर तुम्हाला रस्त्यावर पैसे पडलेले आढळल्यास त्याचा संबंध तुमच्या जीवनाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. अशा वेळी रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ आणि ज्योतिषशास्त्रात याचा काय अर्थ आहे ते जाणून घ्या
रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे हे ज्योतिष आणि वास्तु दोन्हीमध्ये शुभ मानले जाते. ते अनेक शुभ संकेत घेऊन येते. रस्त्यावर पैसे सापडणे हे धनाच्या आगमनाचे आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे हे सिद्धीचे प्रतीक आहे आणि पूर्वजांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो.
कामावरून परतताना रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे हे त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होणार असल्याचे लक्षण आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामावर असताना रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे याचा अर्थ असा होतो की, काम वेळेवर पूर्ण होईल आणि ते यशस्वी होईल.
जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि प्रवासादरम्यान पैसे सापडले तर ते तुमच्या प्रयत्नात यश मिळण्याचे लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.
जर तुम्हाला कामावरून परतताना पैसे सापडल्यास त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच मोठी रक्कम मिळेल.
रस्त्यावर सापडलेले नाणे जपून ठेवणे शुभ मानले जाते. ते अनेक हातातून गेले असल्याने ते सकारात्मक ऊर्जा साठवते असे मानले जाते. ते तुमच्यासोबत ठेवल्याने समृद्धी आणि सौभाग्य लाभते, अशी मान्यता आहे.
जर तुम्हाला जुने धातूचे नाणे सापडले तर ते विशेषतः दैवी आशीर्वाद मानले जाते. आजकाल चलनात असलेली सामान्य धातूची नाणी देखील या श्रेणीत येतात, म्हणून ती सापडणे शुभ मानले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक व ज्योतिष मान्यतेनुसार, रस्त्यावर पैसे सापडणे कधी शुभ तर कधी अशुभ मानले जाते. हे ठिकाण, वेळ आणि मनःस्थिती यावर अवलंबून असते.
Ans: थेट वापरण्याआधी ते दान, पूजन किंवा गरजू व्यक्तीस देणे अधिक शुभ मानले जाते.
Ans: हे आर्थिक संधी येण्याचे संकेत असू शकतात तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सूचनाही मानली जाते