फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 22 डिसेंबर. आज पौष महिन्याचा दुसरा दिवस. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मकर राशीमध्ये संक्रमण करेल. अशा वेळी वसुमान योग तयार होईल. उत्तराषाढा नक्षत्रामुळे ध्रुव योग तयार होईल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढू शकतो आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही आज वाहनांची खरेदी करू शकता. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामानिमित्त प्रवास करणे फायदेशीर राहील. सरकारी क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. दीर्घकालीन बचत योजनेत तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असल्यास तुम्हाला ते परत मिळू शकतात. नातेवाईकांशी चांगले संबंध राहतील आणि तुम्हाला आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल. कोणतेही प्रलंबित व्यवसायिक करार अंतिम होऊ शकतात. शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये तुम्ही वेळ घालवाल. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






