Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेब सीरिज, क्राईम शोज मालिकेतून गुन्ह्यांच्या क्लुप्त्यांचेच प्रसारण; गुन्हेगारीचा आलेख वाढतीवर, पोलिस प्रशासन त्रस्त

खून, चोरी, दरोडा, आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फ्राॅड (murder, theft, robbery, financial fraud, online fraud) यासारख्या गुन्हेविषयक कृत्यांकरिता गुन्हेगारी क्षेत्रात नवख्या असलेल्या गुन्हेगारांना (criminals) अनुभवी गुन्हेगारांची.....

  • By Amol Thakre
Updated On: Jul 04, 2021 | 05:11 PM
वेब सीरिज, क्राईम शोज मालिकेतून गुन्ह्यांच्या क्लुप्त्यांचेच प्रसारण; गुन्हेगारीचा आलेख वाढतीवर, पोलिस प्रशासन त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). खून, चोरी, दरोडा, आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फ्राॅड (murder, theft, robbery, financial fraud, online fraud) यासारख्या गुन्हेविषयक कृत्यांकरिता गुन्हेगारी क्षेत्रात नवख्या असलेल्या गुन्हेगारांना (criminals) अनुभवी गुन्हेगारांची कोचिंग (Coaching) घेण्याची गरज नाही; अशांकरिता गुन्हे करण्यासाठी ‘एकाहून एक’ सर क्लुप्त्या (ideas) गुन्हेविषयक वेब सीरिज, क्राईम शोजमधून निःशुल्क मिळून जातील. मुळात हे सर्व सत्यात उतरत आहे. कारण, नागपुरात अलीकडेच घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या मुळाशी आरोपीने वेबसीरीज पाहून असं कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आॅनलाईन वेब सीरीज आणि क्राईम शोजने (online web series and crime shows) पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे.

[read_also content=”दुःखद ! १२ दिवसांच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; शहरवासी हळहळले https://www.navarashtra.com/latest-news/12-day-old-baby-dies-from-corona-the-townspeople-shuddered-nrat-150797.html”]

नागपुरात संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या गुन्ह्याच्या आणि खासकरून हत्येच्या अनेक घटना घडत असतात. एकट्या जून महिन्यातच नागपूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून 14 वेगवेगळ्या घटनांमध्ये 19 जणांची हत्या झाली आहे. आणि बहुतांशी घटनांमधील आरोपी हे सराईत गुन्हेगार नसले तरी त्यांनी केलेलं कृत्य अतिशय क्रूर आणि मन सुन्न करणारे होते. पोलिसांच्या तपासात यापैकी चार घटनांमधील आरोपी वेब सीरिज किंवा क्राईम शो पाहून गुन्ह्याकडे वळल्याचे आणि गुन्ह्यासाठी नियोजन केल्याचे समोर आले आहे. तर काही आरोपी पॉर्न फिल्मचे आहारी गेल्याचे ही सायबर तपासात समोर आले आहे.

[blockquote content=”काही आॅनलाईन पाॅर्न वेबसीरीज प्रोव्हायडर्स ‘ओटीटी प्लॅटफाॅर्ममुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे बाललैंगिक गुन्हे्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली असून किशोरवयीन मुलांमध्ये याचे ट्रेंड वाढत आहे. काही शाळांमध्ये नववी ते बारावी वर्गातील मुलांनी पोर्न वेबसीरीजच्या नादी लागून नकळत लैंगिक गुन्हे केले. पण, शाळा-काॅलेजेसची इभ्रत वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून पोलिसांनी अशा मुलांना खडसावून समज दिली. दरोड्याच्या 10 पैकी 7 प्रकरणात आरोपीने गुन्ह्याच्या आयडियाज वेबसीरज आणि क्राईम शोजमधून घेतल्याच्या पोलिस तपासात उघड झाले. एकंदरित अशा कार्यक्रमांमुळे चॅनर्लची ‘टीआरपी’ वाढत असली तरी यामुळे घडणारे गुन्हे पोलिस विभागासाठी डोकेदुखी ठरत आहेत. — पी. आय. यादव, वरिष्ठ पोलिस अधिकारी, पुणे ” pic=”” name=””]

पाचपावली परिसरात बागल आखाड्याजवळ 20 जूनच्या रात्री घडलेले मातूरकर आणि बोबडे कुटुंबातील 5 जणांच्या हत्या प्रकरणाचा आरोपी आलोक मातूरकर युट्युबवर अनेक क्राईम शोज पाहायचा. शिवाय तो पॉर्न फिल्मही खूप पाहायचा. एवढेच नाही तर मेहुणीला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तो वशीकरण संदर्भात व्हिडीओज पाहत असल्याचे पोलिसांच्या सायबर तपासात समोर आले आहे.

12 जून रोजी आपल्या आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरज शाहूने शेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय राज पांडेचा अपहरण करत त्याच्या काकाचं कापलेलं शीर दाखवण्याची मागणी केली होती. नंतर त्याने 15 वर्षांच्या राजची हत्या केली होती. तो क्रूरकर्मा सूरज शाहू क्राईम शो पाहायचा आणि एक वेब सीरिज पाहूनच त्याला या गुन्ह्याची युक्ती सुचल्याचे तपासात समोर आले आहे.

4 जून रोजी पिपळा फाटा परिसरात बंदुकीच्या धाकावर दोन तास बिल्डर असलेल्या वैद्य कुटुंबाला ओलीस ठेवणाऱ्या आरोपीने ही झटपट पैसा कमवण्यासाठी वेब सीरिज पाहूनच ओलीस ठेऊन खंडणी मागण्याची युक्ती लढवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 16 जून रोजी नागपूरच्या मनीष नगर भागात राहणाऱ्या डॉक्टर पांडे दाम्पत्याला त्यांच्या दोन मुलांचे अपहरण करण्याठी धमकी देत खंडणी मागणारी संपन्न घरातील गृहिणीनेही क्राईम शो पाहूनच खंडणी मागून त्या पैशातून आपला व्यवसाय सुरु करण्याची युक्ती अमलात आणल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

या सर्व घटनांचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे सर्वच घटनांचे आरोपी नवखे असून त्यांनी केलेले हे पहिलेच गुन्हे होते. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत अतिरंजित पद्धतीने कथानक रचलेले आणि गुन्हा घडवल्यानंतर किती सोप्यारितीने आरोपी पसार होऊ शकतो हे वेब सीरिज आणि क्राईम शोमध्ये सहज दाखवले जाते. आणि गुन्हा करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नवख्या आरोपींच्या मनोदशेवर ते खोलवर परिणाम करतात आणि ते गुन्हेगारीच्या चिखलात उतरतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नागपुरात हत्या आणि त्यासारखे गंभीर गुन्हे काही नवीन नाही. त्यामधील चार घटनांच्या तपासात वेब सीरिज आणि क्राईम शोजचे दुष्परिणाम असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. इतक्यात तर उपराजधानी नागपुरात नवीन गुन्हेगारांकडून अत्यंत भयावह गुन्हे घडवल्याच्या अनेक घटना समोर येत असून नागरिक आणि पोलिसांसाठी ती जास्त चिंतेची बाब आहे.

जर गुन्ह्याची वृत्ती असूनही गुन्हा घडवण्याची हिम्मत नसलेल्या नवख्या गुन्हेगारांना अतिरंजित पद्धतीने चित्रित केलेल्या वेब सीरिज आणि क्राईम शोज गुन्ह्याकडे घेऊन जाणाऱ्या ठरत असतील तर त्यावर कायद्याने बंधने लादणे समाजाच्या हितासाठी आवश्यक झाले आहे.

Web Title: Audience entertainment a headache for the police web series crime show series broadcast of crime secrets as the crime graph rises the police administration suffers nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2021 | 05:11 PM

Topics:  

  • porn movies

संबंधित बातम्या

Delhi High Court: अरेरे… दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला अश्लील व्हिडिओ; न्यायाधीशांसह वकीलही अवाक
1

Delhi High Court: अरेरे… दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला अश्लील व्हिडिओ; न्यायाधीशांसह वकीलही अवाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.