Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बी.जी.देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेची घोषणा ! या तारखेपर्यंत घेता येणार सहभाग, वाचा स्पर्धेचे नियम

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेद्वारे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित केली गेली आहे. यासोबतच स्पर्धेचे विषयही देण्यात आले आहेत. जाणून घ्या या स्पर्धेचे नियम

  • By नारायण परब
Updated On: Oct 28, 2024 | 09:09 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित केली गेली आहे.  या वार्षिक  निबंध स्पर्धेचे विषय आहेत, विकसित भारत- ‘सन २०४७’,(Viksit Bharat-India in 2047, उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण (Public Policy for the Marginalized)आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग(Use of Artificial Intelligence in Government) या विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा- National Housing Bank भरतीसाठी तात्काळ करा अर्ज ! वयोमर्यादा 23 ते 35, पगार 78230 रुपये

स्पर्धकांसाठी महत्वाच्या सूचना

  • वरील नमूद केलेल्या कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून निबंध सादर करावयाचा आहे.
  • निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा.
  • निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे.
  • स्पर्धकाने निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करावा.
  • स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये.
  • निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून); टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.
  • या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ बक्षिस दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा- जगभरात साजरी होते दिवाळी ! भारतासहित ‘या’ देशांमध्येही दिवाळीनिमित्त शाळांना मिळते सुट्टी

प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. स्पर्धकांच्या निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. निबंध स्पर्धेतील बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक पुढील  तीन वर्षे या स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र असणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी), टोपणनाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर ‘बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा, २०२४-२०२५’ असे नमूद करावे. हा लिफाफा ‘मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मादम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२’ या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: js.mrb-iipa@gov.in द्वारे संपर्क साधावा.

Web Title: Bg deshmukh annual essay competition announcement to participate till this date read the rules of the competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 09:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.