फोटो सौजन्य- iStock
भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीची आज वसुबारसपासून सुरुवात झाली आहे. पुढील 5 दिवस हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा विशेष सण दिव्यांचा सण आहे. . देशात दिवाळीनिमित्त सर्व शाळा, महाविद्यालयांसह इतर शैक्षणिक संस्था, बँका, कार्यालयांना सुट्टी देण्यात येते. या सणात लोक सोने, चांदी, गाड्या, भांडी, नवीन कपडे इत्यादी खरेदी करतात तसेच मित्र आणि नातेवाईकांना भेटतात. आता भारतासहित अनेक देशांमध्ये दिवाळीची सुट्टी देण्यात येते.
भारतात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येतेच. आता इतर अनेक देशांमध्येही दिवाळीला तितकेच महत्त्व आहे त्यात नेपाळ, बाली, सिंगापूरसह अनेक देशांमध्ये दिवाळीची धुमधाम असते. अमेरिकेमधील काही राज्यांमध्ये दिवाळीला शाळांना आणि आस्थापनांना सरकार कडून सुट्टी देण्यात येते. यावरून समजू शकतो की केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी सुट्टी दिली जाते.
अमेरिका दिवाळी सुट्टीचा कायदा मंजूर
भारतीय लोक मोठ्या संख्येने अमेरिकेत राहतात. तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील व्हाइट हाऊसमध्ये दिव्यांची आरास केली जाते. अमेरिकेमधील पेनसिल्व्हेनिया राज्याने दिवाळीचा सण अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करणारा कायदा केला आहे. हे विधेयक पेनसिल्व्हेनिया सिनेटमध्ये 50-0 ने मंजूर झाले. या पेनसिल्व्हेनियामध्ये सुमारे 2,00,000 दक्षिण आशियाई राहतात आणि त्यांच्यासाठी दिव्यांचा उत्सव हा आनंदाचा प्रसंग आहे.न्यूयॉर्कमध्येही दिवाळीची सुट्टी देण्यात येते. 2023 मध्ये महापौरांनी दिवाळीनिमित्त शाळांना सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली होती. याठिकाणी दिवाळीसोबतच ईदचीही सुट्टी देण्यात येते.
आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवाळी सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. हिंदु, बौध्द, शिख धर्मिय लोक हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करतात.
या देशांमध्ये असते दिवाळीनिमित्त सुट्टी
नेपाळ- नेपाळमध्ये दिवाळी सणाला स्वन्ति म्हणण्यात येते. तेथे हा सण 5 दिवस साजरा केला जातो.
श्रीलंका- श्रीलंकेमध्ये असंख्य तमिळ भाषिक लोक राहतात तेथील प्रांतामध्ये शासनाकडून सुट्टी देण्यात येते.
मॉरिशियस- मॉरिशियस या देशामध्ये मोठ्यासंख्येने हिंदू धर्मिय राहतात. त्यामुळे तेथे दिवाळीनिमित्त शासनाकडून सुट्टी दिली जाते.
मलेशिया- मलेशियामध्ये दिवाळीच्या निमित्ताने शाळा महाविद्यालये सरकारी आस्थापनांना सुट्टी असते. तेथे दिवाळीत ऑईल बाथ करण्याची पद्धत आहे.
सिंगापूर – सिंगाापूरमध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात त्यामुळे तेथील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येते. तेथे दिवाळीनिमित्त मोठ्या स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो या आफ्रिकंन आणि अमेरिकन खंडातील देशांमध्येही दिवाळीनिमित्त सुट्टी दिली जाते.