सौजन्य- SPJIMR Website
मुंबई: भारतीय विद्या भवनच्या श्रेयांस प्रसाद जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR)कडून आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बिझनेस मॅनेजमेंट) (पीजीडीएम (बीएम)) अभ्यासक्रमाच्या २०२४-२६ बॅचच्या विद्यार्थ्यांचे आज स्वागत करण्यात आले. या बॅचमध्ये विविध प्रकारच्या पार्श्वभूमीचे विविध राज्यातील विद्यार्थी आहेत. भविष्यातील नेते घडवण्याच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्मिती ही एसपीजेआयएमआरची वचनबद्धता आहे.
एसपीजेआयएमआरचे डीन प्रा. वरूण नागराज यांचे सहभागी विद्यार्थ्यांना संबोधन
एसपीजेआयएमआरचे डीन प्रा. वरूण नागराज म्हणाले की, “आमचा खास पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) अभ्यासक्रम एक वैविध्यपूर्ण वैयक्तिक, प्रादेशिक, शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीकोन देतो आणि एका सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरणाला प्रोत्साहन देतो. आमचे ध्येय हे भविष्यातील नेते घडवण्याचे आहे. ते आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करतील, अत्यंत योग्य प्रकारे नवसंशोधनाचा वापर करतील आणि एक अर्थपूर्ण सामाजिक परिणाम साधण्याचा प्रयत्न करतील. वैविध्यपूर्णता वर्गातील अनुभव अधिक समृद्ध बनवते आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेत व समाजात सकारात्मक बदल घडवणे शक्य होते.”
बॅचमध्ये २६ राज्य ३५० शहरातील विद्यार्थ्यानी घेतला प्रवेश
पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) अभ्यासक्रमातील सहभागी विद्यार्थी देशातील २६ राज्ये आणि ३५० शहरांमधून आलेले आहेत. पीजीडीएम अभ्यासक्रमात ६६ टक्के पुरूष आणि ३४ टक्के महिला सहभागी आहेत, तर पीजीडीएम (बीएम) अभ्यासक्रमात ७५ टक्के पुरूष व २५ टक्के महिला सहभागी आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये विविध प्रकारच्या पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत. जसे बँकिंग आणि विमा, वित्तपुरवठा आणि वाणिज्य, कला आणि ह्युमॅनिटीज, व्यवस्थापन आणि विज्ञान. त्यातले जवळपास ६० टक्के विद्यार्थी इंजिनीअर्स आहेत. या वैविध्यपूर्ण संयोजनामुळे बहुआयामी विचार आणि नावीन्यपूर्ण समस्या निवारण पद्धत विकसित होण्यास मदत मिळते.
विद्यार्थी करतात 200 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व
PGDM सहभागींपैकी 88% आयटी कन्सल्टिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, ई-कॉमर्स आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमधील आहेत. त्याचबरोबर यातील सहभागी 200 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात असेंचर, अमेरिकन एक्सप्रेस, ब्लॅकरॉक, डेलॉइट कन्सल्टिंग, ईवाय, आयबीएम, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे.
एसपीजेआयएमआरचे पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) अभ्यासक्रम भविष्यातील लीडर्सना नवकल्पना आणि सामाजिक प्रभावासाठी वचनबद्धता, क्षमताविकास तसेच विविधांगी दृष्टीकोन यांच्याद्वारे सक्षम करतात. एसपीजेआयएमआर आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील माहितीपूर्ण, उत्कट आणि नैतिक आकांक्षांना चालना देऊन त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासाची वाट पाहत आहे!