MTNL-BSNL एकत्र झाल्यानंतर चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा आणि बरच काही...
जिओच्या परवडणाऱ्या प्लॅनवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. तुम्ही जर नवीन रिचार्ज प्लान शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला बीएसएनएल बद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये युजर्सना अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत, परंतु बीएसएनएल अजूनही जुन्या किमती लागू करत आहे. त्याचा परिणाम सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या यूजर बेसवर दिसून येत आहे. बीएसएनएलच्या यूजर बेसमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. BSNL चे अनेक प्लान आहेत जे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम ऑफर देत आहेत. याविषयीच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
तुम्ही बीएसएनएल सिम वापरत असाल तर ही बातमी तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकते. जर युजर्स स्वस्त योजना शोधत असतील तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बीएसएनएलच्या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे आणि यामध्ये तुम्हाला ब्राउझिंग डेटासोबत व्हिडिओ स्ट्रीमिंगचाही ऑप्शन मिळत आहे. या सर्व ऑफर तुम्हाला बीएसएनएल 229 रुपयांमध्ये दिल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग पूर्णपणे मोफत दिले जात आहे.
बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाही दिला जात आहे. ग्राहकांना एकूण 60GB डेटा दिला जात आहे. ही संपूर्ण ऑफर युजर्सना या संपूर्ण कालावधीसाठी दिली जाईल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट दिले जात आहे. हा पॅक तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय सिद्ध होणार आहे. हे Jio, Airtel आणि VI च्या प्लॅनसारखे आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसदेखील दिले जात आहे.
हेदेखील वाचा – BSNL ने मारली बाजी! टाटाच्या सहकार्याने सरकार करणार मोठा धमाका, या दिवसापासून मिळणार फास्ट इंटरनेट
BSNL ने महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) सोबतही आता हातमिळवणी केली आहे. ही कंपनी दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणीही आपली सेवा देणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्या यामध्ये आपापले योगदान देणार आहेत. यासाठी सरकारकडून 10 वर्षांचा करारही करण्यात आला आहे. याद्वारे लोकांना कमी किमतीत फास्ट इंटरनेट सुविधा मिळणार आहे. अशा परिस्थितीत ही एक चांगली योजना ठरू शकते, असे म्हणता येईल.