फोटो सौजन्य - Social Media
काही दिवसांपूर्वी देशभरामध्ये वीज विभागात भरतीला सुरुवात झाली होती. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून वीज विभागामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार होते. मुळात या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास मोठी संख्या दर्शवली आहे. एकंदरीत, मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करण्यात आले आहे. परंतु १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. या भरतीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यानंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. रोजगाराच्या शोधत असणारे आज अर्ज करून या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकतात. तर ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे परंतु व्यस्थ जीवनशैलीमुळे अर्ज करण्यास वेळ मिळाला नाही. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे कि, आज कसेही करून अर्ज करून घ्या अन्यथा नंतर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून, विजेचा मीटर रीडर पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या पदासाठी एकूण ८५० जागा शिल्लक आहेत. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. या अधिसूचनेमध्ये या भरती विषयी सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या अधिसूचनेचा नक्कीच आढावा घ्यावा. यात नमूद असलेल्या मुद्द्यांसाध्य आधारे तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.
मुळात बहुतांश भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करतेवेळी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागते. या भरतीचे वैशिष्ट्ये म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही आहे. एकंदरीत, उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधित काही अटी शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ असावे , तर २८ वर्षांपर्यंतची आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
हे देखिल वाचा : करिअरमध्ये खूप महत्वाचे असते जन्म प्रमाणपत्र; अशा प्रकारे घर बसल्या काढा, ते ही ५ मिनिटांत
विशेष गोष्ट अशी कि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट दिली गेली आहे. अधिसूचनांमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, ५ वी ते ८ वी दरम्यान शिक्षण झालेले उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक अटी सखोल अभ्यासणासाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा. १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येण्याची मुभा असल्याने उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.