फोटो सौजन्य - Social Media
आताच्या काळामध्ये दस्तऐवज फार महत्वाचे झाले आहेत. प्रत्येक दस्तावेजाला एक ठराविक महत्व आहे. एकंदरीत, करिअर संबंधित प्रत्येक कामामध्ये दस्तऐवजांची फार गरज असते. एखाद्या व्यक्तीकडे पुरेशा दस्तऐवजांची कमी असल्यास याचा मोठा परिणाम त्या व्यक्तीच्या करिअरवर होतो. त्यामुळेच प्रत्येक भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये दस्तऐवजांची तपासणी या टप्प्याचा समावेश असतो. दस्ताऐवज इतके महत्वाचे असतात कि त्यावर आपले भवितव्य अवलंबून असते. या दस्तऐवजांमध्ये आयडी प्रूफ, घराचे डॉक्युमेंट्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.
हे देखील वाचा: ISRO मध्ये ९९ रिक्त जागांसाठी होणार भरती प्रक्रिया; अधिसूचना झाली जाहीर
त्यापैकी महत्वाचे असे दस्तऐवज म्हणजे जन्म प्रमाणपत्र. एखाद्या बाळाच्या जन्मानंतर त्याचे जन्म प्रमाणपत्र जाहीर केले जाते. हे दस्तऐवज त्या बाळाच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा असतो. त्याला जपून ठेवणे फार गरजेचे असते. परंतु, जुन्या लोकांकडे या गोष्टी उपलब्ध नसतात. तर कधी कधी बेफिकीरपणामुळे आपले जन्म प्रमाणपत्रासारखे महत्वाचे दस्तऐवज आपल्याकडून हरवले जाते. अशा वेळी आपल्याला एखाद्या कामामध्ये जर जन्म प्रमाणपत्राची गरज भासली तर अडचण निर्माण होऊ शकते. परंतु, भार घेण्याची मुळीच गरज नाही. आपले जन्म प्रमाणपत्र आपण घर बसल्या अवघ्या काही मिनिटांत बनवू शकतो.
जन्म प्रमाणपत्र असणे फार महत्वाचे असते. २००३ साली या दस्तऐवजाला सरकारी दस्तऐवज म्हणून मान्यता मिळाली आहे. तेव्हापासून या दस्तऐवजाची गरज अनेक कामांसाठी पडते. त्यामुळे आपल्याजवळ ते शाबूत असणे फार महत्वाचे असते. लहान मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी जन्म प्रमाणपत्र फार आवश्यक असते. सध्याच्या काळामध्ये रुग्णालयातूनच बाळाचे जन्म प्रमाणपत्र मिळून जाते. जर नाही तर तुम्ही या पद्धतीने घर बसल्या जन्म प्रमाणपत्र तयार करू शकतात.
हे देखिल वाचा : दर महिन्यात कमवा ५० हजार रुपये; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पार्ट टाइम जॉबचा उत्तम पर्याय
अशा प्रकारे काढता येईल जन्म प्रमाणपत्र
सगळ्यात अगोदर आपल्याला ऑफिशिअल पोर्टल जावे लागेल. त्यानंतर मुख पृष्ठवरील General Public Sign Up या पर्यायाला निवडा. यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्या. आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून फॉर्म सबमिट करा. लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यावर आपण पुन्हा मुख पृष्ठावर याल. Apply For Birth Registration या पर्यायाला निवडून समोर जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा फॉर्म दिसून येईल. त्यावर मागितलेली आवश्यक ती माहिती भरून घ्यावी. आवशयक त्या दस्तऐवजांची पूर्तता करावी आणि फॉर्म सबमिट करावा. या फॉर्मची एक प्रत स्वतःजवळ ठेवावी तर दुसरी प्रत संबंधित विभागामध्ये जमा करावी. या प्रमाणपत्राला ऑनलाईनही डाउनलोड करता येऊ शकते.