• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Cervical Cancer Can Be Cured After Examination And Treatment Nrvb

तपासणी व उपचाराअंती ‘सर्व्हिकल कॅन्सर’ बरा होऊ शकतो

भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात जास्त आढळणारा ‘सर्व्हिकल कॅन्सर’ हा रोग आहे. या रोगाने ग्रस्त असलेल्या महिलांची संख्या मोठी असली, तरी हा रोग टाळण्याचे व तो झाल्याचे लवकर आढळल्यास त्यावर यशस्वी उपचारांचे मार्गही अस्तित्वात आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 20, 2021 | 09:04 PM
तपासणी व उपचाराअंती ‘सर्व्हिकल कॅन्सर’ बरा होऊ शकतो
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

– डॉ. रिचा बन्सल

‘कार्सिनोमा ऑफ युटेरीन सर्व्हिक्स’, म्हणजे ‘सर्व्हिकल कॅन्सर’ – गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग – हा भारतातील स्त्रियांसमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. जगात ‘सर्व्हिकल कॅन्सर’ मुळे जितक्या स्त्रियांचे मृत्यू होतात, त्यांपैकी १५.२ टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात, असे काही अहवालांमध्ये नमूद आहे. याचा अर्थ, दर आठ मिनिटांनी एक महिला या रोगाला बळी पडते. या कर्करोगाला प्रतिबंध करता येतो व उपचारही उपलब्ध आहेत, तरीही ही परिस्थिती आहे.

भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात जास्त आढळणारा ‘सर्व्हिकल कॅन्सर’ हा रोग आहे. या रोगाने ग्रस्त असलेल्या महिलांची संख्या मोठी असली, तरी हा रोग टाळण्याचे व तो झाल्याचे लवकर आढळल्यास त्यावर यशस्वी उपचारांचे मार्गही अस्तित्वात आहेत. अशावेळी, ‘एचपीव्ही लसी’विषयीची जनजागृती आणि आरोग्य व स्वच्छता यांची काळजी घेऊन नियमित वैद्यकीय चाचण्या करून घेण्यास प्रोत्साहन देणे, ही महत्वाची पावले उचलण्याची गरज आहे.

गर्भाशयाची खालची बाजू योनीशी जोडली जाते, त्या भागास ‘सर्विक्स’ असे म्हणतात. तेथील पेशींमध्ये होणाऱ्या कर्करोगास ‘सर्व्हिकल कॅन्सर’ म्हणतात. प्रामुख्याने, ‘सर्व्हिकल कॅन्सर’ हा ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ च्या (एचपीव्ही) संक्रमणामुळे होतो. ‘एचपीव्ही विषाणू’ हा ‘सर्व्हिकल डिस्प्लेशिया’ किंवा ‘सर्व्हिकल पेशीं’च्या असामान्य वाढीस कारणीभूत ठरतो.

‘एचपीव्ही’ च्या संसर्गाशिवाय, ‘सर्व्हिकल कॅन्सर’च्या उत्पत्तीशी संबंधित इतरही अनेक कारणे आहेत, उदा. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, एकाहून अधिक लैंगिक भागीदार, धूम्रपान, गर्भनिरोधकांचा दीर्घकालीन वापर, लहान वयात गर्भधारणा किंवा अनेक वेळा गर्भधारणा, इत्यादी. लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या प्रौढांपैकी ७० टक्के जणांना, ‘एचपीव्ही’ विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो, असे आकडेवारी सांगते. या विषाणूचे असंख्य प्रकार आहेत. यातील अनेकांच्या संसर्गाचे निराकरण करणे सोपे आहे आणि या विषाणूमुळे कर्करोग होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १ टक्का किंवा त्याहूनही कमी आहे.

‘सर्व्हिकल कॅन्सर’ ची तपासणी

सर्व्हिकल कॅन्सर शोधण्यासाठी सर्वात प्रथम करण्याजोगी गोष्ट म्हणजे नियमित तपासणीसाठी क्लिनिकला भेट देणे आणि ‘एचपीव्ही’ पासून बचाव करण्यासाठी लसदेखील घेणे. ‘सर्व्हिकल कॅन्सर’ रोखण्यासाठी किंवा प्रारंभिक टप्प्यावर त्याचा शोध घेण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.

‘पॅप टेस्ट’ या चाचणीस ‘पॅप स्मीयर’ असेही म्हणतात

‘पापानीकोलाऊ चाचणी’ किंवा ‘पॅप स्मीयर’ या चाचणीतून ‘सर्व्हिक्स’वरील कर्करोग-पूर्व पेशींचे अस्तित्व किंवा पेशींमधील बदल शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेळेवर उपचार न घेतल्यास या पेशींमुळे ‘सर्व्हिकल कॅन्सर’ होऊ शकतो.

एचपीव्ही चाचणी

या चाचणीतून ‘पॅपिलोमाव्हायरस’ची उपस्थिती लक्षात येते. या विषाणूमुळे पेशींमध्ये बदल होऊ शकतो आणि त्यांचे रुपांतर कर्करोगाच्या पेशींमध्ये होऊ शकते. स्त्रियांनी वयाच्या 21व्या वर्षापासून पॅप चाचणी करून घ्यावी, अशी शिफारस केली जाते. पहिल्या चाचणीचे निष्कर्ष सामान्य असतील, तर दुसर्‍या चाचणीसाठी क्लिनिकला जाण्यापूर्वी महिला आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करू शकतात.

लवकर निदान होणे महत्वाचे

सर्व्हिकल कॅन्सर वर उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच, सामान्य लक्षणे आणि चिन्हे यांच्याद्वारे तो लवकर ओळखला जाणे महत्वाचे आहे. असामान्यपणे किंवा अनियमित स्वरुपात योनीतून रक्तस्त्राव किंवा लैंगिक संभोगानंतर वा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव; योनीतून येणारा नेहमीपेक्षा वेगळा स्त्राव, आणि संभोगादरम्यान होणाऱ्या वेदना, मासिक पाळीशी संबंधित नसणाऱ्या पेल्विक वेदना अशी ही लक्षणे असतात. आरोग्याच्या इतर समस्यांशीदेखील ही लक्षणे संबंधित असू शकतात. म्हणूनच, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आपल्या शरीरात काय घडत आहे, याविषयी अधिक माहिती मिळविणे नेहमीच चांगले.

सर्व्हिकल कॅन्सर वर उपचार

सर्व्हिकल कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे, यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. ‘सर्व्हिकल कॅन्सर’च्या उपचारांमध्ये ‘केमोथेरपी’, ‘रेडिएशन थेरपी’ आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. ‘कार्सिनोमा ऑफ युटेरीन सर्व्हिक्स’ची तीव्रता व गांभीर्य लक्षात घेऊन त्यावरील उपचारांची एकल किंवा संयुक्त पद्धत ठरविली जाते.

‘एचपीव्ही लसी’ द्वारे प्रतिबंध

सर्व्हिकल कॅन्सर रोखण्याचा एक सिद्ध मार्ग म्हणजे ‘एचपीव्ही’वर लस घेणे. कोणत्याही लैंगिक संपर्कापूर्वी लहान वयातच लस घेणे चांगले. ही लस १० ते २६ वयोगटातील स्त्रियांसाठी आहे आणि ४६ वर्षे वयापर्यंत ती दिली जाऊ शकते.

‘सर्व्हिकल कॅन्सर’ प्रतिबंधात्मक आहे आणि तो बरा होऊ शकतो. तो उद्भवण्यापूर्वीच त्याचा इलाज करूयात.

(लेखिका सल्लागार, स्त्रीरोग ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स येथे कार्यरत आहेत.)

Web Title: Cervical cancer can be cured after examination and treatment nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2021 | 09:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर

नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर

Feb 19, 2026 | 11:50 AM
Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

Feb 19, 2026 | 11:50 AM
Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स;  नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स; नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

Feb 19, 2026 | 11:43 AM
काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

Feb 19, 2026 | 11:42 AM
T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे

T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे

Feb 19, 2026 | 11:33 AM
AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 11:29 AM
देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

Feb 19, 2026 | 11:26 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.